Home हेल्थ ग्लुएन बॅरी सिंड्रोम उद्भवला पाणीपुरी मधील पाण्याने!

ग्लुएन बॅरी सिंड्रोम उद्भवला पाणीपुरी मधील पाण्याने!

by sandy
0 comments
ग्लुएन बॅरी सिंड्रोम

पुण्यात शिकायला आलेल्या तरुणीचा जीबीएसमुळे झाला मृत्यू!

 
पुण्यात काही दिवसांपूर्वी धक्कादायक बाब समोर आली आहे. पुण्यात शिकण्यासाठी आलेल्या तरुणीचा जीबीएस रोगामुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास येत आहे. पाणीपुरी खाल्ल्यानंतर हा त्रास उद्भवला असल्याचे ऐकिवात आले आहे. या आजाराचा त्रास लहान आणि वृद्ध वयोगटाला होत असल्याची माहिती होती, परंतु आता हा आजार तरुण पिढीला देखील संभवतो आहे. या बातमीमुळे पुणेकरांमध्ये जीबीएस या आजाराबद्दल खळबळ निर्माण झाली आहे. पुणेकरांनी आता याबाबत सावधानी पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 
 
जीबीएस मुळे जीव गमावलेली ही तरुणी मूळची बारामतीची असून पुण्यातील सिंहगड भागात शिक्षण घेण्यासाठी आली होती. पुण्यात असताना पाणीपुरी खाल्ल्यानंतर तिला थोडाफार त्रास सुरु झाला आणि बारामतीला परत गेल्यानंतर तिला जुलाब तसेच मोठ्या प्रमाणात अशक्तपणा जाणवायला लागला. यावेळी तिचे नातेवाईक चिंतेत पडले आणि तिला बारामतीमधील डॉक्टरांकडे तपासणीसाठी घेऊन गेले. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला त्वरित पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. तिच्या नातेवाईकांनी तिला पुण्याच्या नवले रुग्णालयात दाखल केले. ही घटना गेल्या तीन आठवड्यांपूर्वीची आहे. तीन आठवडे ती तरुणी नुसती पाणीपुरी खाल्ल्याने या ग्लुएन बॅरी सिंड्रोम आजाराशी झुंज देत होती, परंतु अखेर तिची ही झुंज मंगळवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी संपली. जीबीएस रोगामुळे त्या तरुणीने स्वतःचा जीव गमावला. २६ वर्षीय या तरुणीचे नाव किरण राजेंद्र देशमुख होते.
  
आपण पाणीपुरी सहज एक आवड म्हणून काही विचार न करता खात असतो. त्यामुळे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होईल याविषयी आपण चिंतेत नसतो, परंतु साध्या एका पाणीपुरीमुळे एक तरुणी जीबीएस आजाराशी झुंज देऊन तिचा जीव जातो ही बातमी  अत्यंत धक्कादायक आहे. यामुळे पुण्यातीलच नव्हे तर सर्व नागरिकांनी दक्ष राहण्याची काळाची गरज आहे. जातीतजास्त बाहेरील अन्न टाळण्याचा प्रयत्न आपण करावा जेणेकरून आपला कोणत्याही रोगाला बळी पडण्यास काही प्रमाणात बचाव होऊ शकेल.
 
पुण्यामध्ये या सिंड्रोमचे अनेक जीव शिकार ठरले आहेत. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील लोकांचा बळी हा आजार घेत आहे. चिकन, पाणी तसेच इतर कारणांमुळे हा आजार उद्भवत असल्याची माहिती अनेक माध्यमांद्वारे मिळाली आहे. यावेळी या आजारापासून स्वतःचा बचाव करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपली जीवनशैली सुधारणे, सात्विक व पौष्टिक अन्न ग्रहण करणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक ठरते. आपल्या आरोग्याची तपासणी तज्ज्ञांद्वारे नियमित करणे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी ठरेल.
 
आपल्या रोजच्या जीवनात निरोगी बदल करावा. नियमित व्यायाम, घरी शिजवलेले पौष्टिक अन्न आणि जंक फूड टाळणे अशा चांगल्या सवयी आपल्या अंगी बाणाव्यात जेणेकरून आपण या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या ग्लुएन बॅरी सिंड्रोम आजारापासून दूर राहू शकतो किंवा आपला त्यापासून बचाव होऊ शकतो. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जीवनशैलीमध्ये अनेक निरोगी बदल करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कोरोना तसेच हा आताच ग्लुएम बॅरी सिंड्रोम असे आजार बदलत्या काळानुसार उद्भवत आहेत. या आजारांवर मात करण्यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक ठरते.

Leave a Comment

Search Here