Home लेटेस्ट न्यूज लाडकी बहीण योजना लाभार्थी ९ लाख बहिणी ठरत आहेत अपात्र! 

लाडकी बहीण योजना लाभार्थी ९ लाख बहिणी ठरत आहेत अपात्र! 

by sandy
0 comments

९ लाख महिला निष्कासित!

गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण योजना’ याबाबत अनेक बदल होत असतानाचे चित्र दिसून येत आहे. सध्या लाडकी बहीण योजनाच्या अपात्रतेची पडताळणी सगळीकडे जोरदार सुरु असल्याची देखील माहिती मिळत आहे. यानुसार, लाडकी बहीण योजनेतून गेल्या काही दिवसात नऊ लाख स्त्रियांना बेदखल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनासाठी कशाप्रकारे पात्रता ओळखली जाते याविषयी थोडी माहिती जाणून घेऊया!


जुलै २०२४ रोजी सुरु झालेल्या या महायुती सरकारच्या लोकप्रिय योजनेमुळे अनेक महिला आनंदी झाल्या होत्या. यामध्ये २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये वेतन सरकारद्वारे मिळण्याची हमी यामध्ये देण्यात आली होती.

बऱ्याच महिलांनी अगदी आशेने आणि उत्सुकतेने या ‘लाडकी बहीण योजना’त भाग घेतला होता. परंतु या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्रतेबाबत अनेक बदल करण्यात आले असल्याचे समजले आहे.

अपात्र असलेल्या अनेक लाडक्या बहिणींना या योजनेतून बेदखल करत असल्याची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेची पडताळणी सगळीकडे सुरु असून अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

विधानसभा निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या निकषांची कठोर अंमलबजावणी करण्यात येत असताना राज्यातील महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी नवे निकष जारी केले आहेत.

अनेक महिलांनी या योजनेच्या आधारे अनेक वस्तू किंवा महत्वाच्या सेवांसाठी आपले पैसे गुंतवले होते. परंतु या नव्या निकषांमुळे अनेक महिलांवर आभाळ कोसळत असल्याचे चित्र दिसत आहे.


यावेळी या नव्या निकषाच्या आधारे नऊ लाख महिला अपात्र ठरवण्यात येत असून सरकारी कारवाईमुळे पाच लाख महिलांची नावे योजनेतून पूर्वीच बेदखल करण्यात आली आहेत.

आता आणखी चार लाख महिलांची नावे वगळण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी या अपात्रतेमुळे सरकार दरबारी पैशांची मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचे देखील दिसून येत आहे.

लाडकी बहीण योजना : कशा प्रकारे बहिणी ठरतील अपात्र:

१) वार्षिक उत्पन्न: 

ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा अधिक असल्यास ती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. 

२) आयकरदाता:

ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये एखादा सदस्य आयकरदाता असेल तर त्या बहिणीला या योजनेतून बेदखल करण्यात येईल. 

३) सरकारी नोकरी:

ज्या कुटुंबातील सदस्य कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/ भारत सरकारच्या संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत अशा कुटुंबातील महिलांना या योजनेत सहभागी होता येणार नाही. 

४) इतर योजनांचा आर्थिक लाभ:

जर महिला इतर सरकारी योजनांद्वारे १५०० किंवा त्याहून अधिक आर्थिक लाभ घेत असेल तर त्या महिलेला या योजनेतून बेदखल करण्यात येत आहे. 

५) चारचाकी वाहन:

ज्यांच्या घरात चारचाकी वाहन कुटुंबातील सदस्यांच्या नावावर रजिस्टर असेल तर अशा महिलांना या योजनेत सहभागी होता येणार नाही. 

ही अशी अनेक बंधनं या थोड्याच काळात लोकप्रिय झालेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये लावण्यात आली आहेत. यामुळे सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधी आपण पात्र वा अपात्र असल्याची हमी करून घ्यावी.

त्यानंतर या योजनेत सहभागी व्हावे. तसेच या नियमांमध्ये अपात्र असलेल्या, परंतु या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनी या योजनेतून बेदखल होत असल्याची जाणीव करून घ्यावी.

लाडकी बहीण योजना : नवे निकष

१) लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करून हयात असल्याचा दाखला जोडावा लागणार आहे

२) लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणार

३) नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही तर अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून मिळणार 

४) अर्जावरील नाव तसेच बँक खात्याचे नाव वेगळे असल्यास महिला या योजनेस पात्र राहणार नाही

५) महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक असायला हवे 

लाडकी बहीण योजनेतील नवे बदल कोणते?

१) लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करून हयात असल्याचा दाखला जोडावा लागणार आहे
२) लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणार
३) नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही तर अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून मिळणार 
४) अर्जावरील नाव तसेच बँक खात्याचे नाव वेगळे असल्यास महिला या योजनेस पात्र राहणार नाही
५) महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक असायला हवे 

लाडकी बहीण योजनेमधून किती महिला बाद झाल्या?

जुलै २०२४ रोजी सुरु झालेल्या या महायुती सरकारच्या लोकप्रिय योजनेमुळे अनेक महिला आनंदी झाल्या होत्या. यामध्ये २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये वेतन सरकारद्वारे मिळण्याची हमी यामध्ये देण्यात आली होती. बऱ्याच महिलांनी अगदी आशेने आणि उत्सुकतेने या ‘लाडकी बहीण योजने’त भाग घेतला होता. परंतु या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्रतेबाबत अनेक बदल करण्यात आले असल्याचे समजले आहे आणि अपात्र असलेल्या अनेक लाडक्या बहिणींना या योजनेतून बेदखल करत असल्याची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेची पडताळणी सगळीकडे सुरु असून अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. विधानसभा निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या निकषांची कठोर अंमलबजावणी करण्यात येत असताना राज्यातील महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी नवे निकष जारी केले आहेत. अनेक महिलांनी या योजनेच्या आधारे अनेक वस्तू किंवा महत्वाच्या सेवांसाठी आपले पैसे गुंतवले होते, परंतु या नव्या निकषांमुळे अनेक महिलांवर आभाळ कोसळत असल्याचे चित्र दिसत आहे. 
यावेळी या नव्या निकषाच्या आधारे नऊ लाख महिला अपात्र ठरवण्यात येत असून सरकारी कारवाईमुळे पाच लाख महिलांची नावे योजनेतून पूर्वीच बेदखल करण्यात आली आहेत. आता आणखी चार लाख महिलांची नावे वगळण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी या अपात्रतेमुळे सरकार दरबारी पैशांची मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचे देखील दिसून येत आहे. 

You may also like

Leave a Comment

Search Here