दोन वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर तसेच महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेप होऊन ३१ जानेवारी २०२३ रोजी तुरुंगात गेलेले संत म्हणवणारे वादग्रस्त धर्मगुरू आसाराम बापू वैद्यकीय कारणासाठी जामिनावर सुटले आहेत. २०२३ साली गुजरातमधील गांधीनगर येथील न्यायालयाने त्यांना ही शिक्षा दिली होती. त्यांचे वय ८६ असून त्यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने उपचार करून घेण्यासाठी सर्वोच न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. सध्या ते राजस्थानातील जोधपूर येथील कारागृहात शिक्षा भोगत असून ३१ मार्चपर्यंत त्यांना जामीन देण्यात आला आहे. यावेळी ते इंदोर येथील आश्रमात पोहोचले आहेत. इथे त्यांचे अनुयायांच्या भेटीगाठी आणि प्रवचनरुपी समाज प्रबोधनाचे कार्य पुन्हा सुरु झाल्याचे दिसून येत आहे.
का गेले होते आसाराम बापू तुरुंगात?
बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगात जाण्यापूर्वी हे आसाराम बापू खूप लोकप्रिय असत. त्यांचे अनेक अनुयायी होते. अनेक प्रवचन श्रोते त्यांचा आदर करत असत. कित्येकांनी त्यांची प्रतिमा आपल्या घरी लावली असून ते रोज त्यांची पूजा देखील करत असत असे सोशल मीडियाद्वारे समोर येत असे. त्यांच्या प्रवचनावेळी प्रवचन ऐकण्यासाठी लोक एकच गर्दी करत आणि संपूर्ण मंडळ तुडुंब भरून जात असे. संतांचे कार्य हेच असते की ग्रंथांद्वारे तसेच पुराणांद्वारे आपल्यासोबतच आपल्या अनुयायांना योग्य मार्गदर्शन करावे, त्यांना चांगला मार्ग दाखवावा. स्वतः काम, क्रोध, मद, मत्सर या तामसी गोष्टींपासून दूर राहावे आणि लोकांमध्ये त्याबाबत जनजागृती करावी. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ यांनी जगण्याचा मार्ग आपल्याला त्यांच्या विवेचनाद्वारे दाखवला आहे. परंतु आता खऱ्या अर्थाने कलियुग आले आहे. इथे माणसच नाही तर संत देखील कृष्णकृत्याच्या मार्गावर चालत आहेत.
जामीनाचे कारण:
संत असल्याच्या आणि लोकांचे प्रवचनाद्वारे मार्गदर्शन करताना आसाराम बापू स्वतः मात्र कृष्णकृत्य करण्यात दंग होते. या ख्यातनाम असलेल्या आणि संत म्हणवणाऱ्या आसाराम बापूंनी अल्पवयीन मुलींवर तसेच महिलांवर बलात्कार केला असल्याची बाब २०२३ रोजी समोर आली होती आणि त्यामुळे त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. परंतु त्यांची प्रकृती खालावली असल्याचे कारण त्यांना तुरुंगवासातून काही दिसव तुरुंगातून बाहेर घेऊन आले आहे. त्यांचे वाढते वर आणि हृदयविकार लक्षात घेता त्यांना ३१ मार्च २०२५ पर्यंत वैद्यकीय कारणामुळे त्यांना जामीन मिळाला आहे. ३१ मार्च नंतर त्यांना पुन्हा कारागृहात जाण्याचा निर्देश आहे.
इंदोरच्या त्यांच्या आश्रमात ते पोहोचले असून तिथे अनुयायांना भेटणे आणि प्रवचन करणे सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी आरोग्य तपासणीसाठी आसाराम बापू रुग्णालयात गेल्याचे देखील समजले आहे. यावेळी त्यांचे अनुयायी त्यांना ओवाळत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि ही अत्यंत शरमेची बाब आहे. एक बलात्कारी माणूस असून अजूनही त्यांचा आदर्श लोकांच्या मनात आहे हे यावरून स्पष्ट होत आहे. कोर्टातर्फे आसाराम बापूंची कोणीही भेट घेण्यास तसेच प्रवचन करण्यास बंदी घालण्यात आली होती, तरी देखील इंदोरला पोहोचल्यावर त्यांचे समाज प्रबोधनाचे कार्य सुरू झाले आहे. उभा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत त्यांनी कोर्टाचे आदेश मोडल्याचे स्पष्ट होत आहे.