Home लेटेस्ट न्यूज पहलगाम आतंकवादी हमल्या मागे स्थानिक कश्मीरी लोकांचा सहभाग

पहलगाम आतंकवादी हमल्या मागे स्थानिक कश्मीरी लोकांचा सहभाग

0 comments
पहलगाम आतंकवादी हमल्या

पहलगाम ला काश्मीरचं नंदनवन म्हणून ओळख आहे .पहलगाम ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जग हादरलंय.

भारताच्या गृह मंत्रालयाने या हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवली आहे. एजन्सींच्या प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यात काही स्थानिक नागरिकांचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इलेक्ट्रॉनिक देखरेखीद्वारे पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणारे किमान १५ स्थानिक काश्मीरी ओव्हरग्राउंड कामगार आणि दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे. या लोकांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना रसद पुरवठा आणि शस्त्रसाठा करून मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सींनी पाच मुख्य संशयिंताना पकडण्याचा प्रयत्न केला असून, त्यापैकी तिघांना ताब्यात घेतलं आहे. तर, उर्वरीत दोन संशयितांचा शोध सुरू आहे. तपासात असेही उघड झाले आहे की, हल्ल्याच्या दिवशी हे आरोपी संबंधित भागात उपस्थित होते. तसेच त्यांचा फोन देखील सक्रिय होता. इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्समध्ये या आरोपींना पाकिस्तानी दहशतवाद्यांशी संवाद साधल्याचे आढळून आले आहे.

सध्या किमान १५ ओव्हरग्राउंड वर्कर्सची चौकशी सुरू असून, पाच ओजीडब्ल्यू हल्ल्यात सक्रिय सहभागी असल्याचे ठोस पुरावे मिळाले आहेत. त्यांच्या चौकशीसाठी जम्मू – काश्मीर पोलीस, इंटेलिजन्स ब्युरो, रॉ आणि एनआयएच्या संयुक्त टीम कार्यरत आहेत.

या हल्ल्यात दोन पाकिस्तानी आणि दोन काश्मिरी दहशतवाद्यांचाही समावेश होता.

You may also like

Leave a Comment

Search Here