एकदंत मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक दौंड येथे दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी , 3 ते 12 वयोगटातील मुलांसाठी मोफत फ्लोराईड अॅप्लिकेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
या शिबिराचे उद्घाटन माननीय भानुप्रताप बर्गे (रिटायर्ड एसीपी) आणि डॉ. राघवेंद्र गाय कैवारी यांच्या हस्ते संपन्न झाले.
भानुप्रताप बर्गे यांनी त्यांच्या कारकिर्दीत 19 एन्काऊंटर केले असून, प्रसिद्ध गुन्हेगारी पात्र माया डोळसचा एन्काऊंटरही त्यांनी केला होता. त्यांच्या शौर्यावर आधारित ‘एन्काऊंटर लोखंडवाला’ हा चित्रपट तयार करण्यात आला होता.
डॉ. राघवेंद्र गाय कैवारी हे दौंड येथील सुपुत्र असून, त्यांनी कोरोना काळात मोफत ऑक्सिजन सिलेंडर वाटप, तसेच दोन न्यायालयांत सुसज्ज लायब्ररी व इंटरनेट लायब्ररी स्थापन करून उल्लेखनीय सामाजिक कार्य केले आहे.
या शिबिरात एकूण 158 मुलांनी सहभाग घेतला. फ्लोराईड अॅप्लिकेशनमुळे मुलांचे दात चार ते पाच वर्षांपर्यंत मजबूत राहतात, दातांवर डाग येत नाहीत व ते आरोग्यदायी राहतात, असे डॉक्टरांनी सांगितले.
शिबिराचे नियोजन डॉ. सोनू मनोज अग्रवाल, डॉ. वरद मनोज अग्रवाल, डॉ. सायली मनोज अग्रवाल आणि डॉ. आशिष गुप्ता यांनी केले.
शिबिर व्यवस्थापनाची जबाबदारी सौ. सविता मनोज अग्रवाल यांनी उत्तम प्रकारे पार पाडली.
या उपक्रमामुळे पालकांमध्ये व बालकांमध्ये दंत आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले.