32
पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर, मृत नागरिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी विशेष पेंशन योजना सुरू करण्याची मागणी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
डॉ. शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की, मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे, जेणेकरून त्यांना त्यांच्या पुढील जीवनाचा आधार मिळेल. या संदर्भात त्यांनी केंद्र सरकारकडे पेंशन योजना त्वरीत सुरू करण्याची मागणी केली आहे.
शिवसेना नेहमीच संकटसमयी नागरिकांच्या खंबीर पने पाठीशी उभी राहते आणि या प्रसंगीही पक्षाने आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.