Home लेटेस्ट न्यूज PSI-23 बॅचमध्ये राज्यात प्रथम आलेल्या अश्विनी केदारींचे दु:खद निधन

PSI-23 बॅचमध्ये राज्यात प्रथम आलेल्या अश्विनी केदारींचे दु:खद निधन

by Arjun Mandwale
0 comments

खेड तालुक्यातील पाळू (जि. पुणे) येथील शेतकरी कुटुंबातील अश्विनी बाबुराव केदारी (वय ३०) या PSI-23 बॅचच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवून महाराष्ट्रात नावाजल्या होत्या. मात्र, २८ ऑगस्ट रोजी झालेल्या घरगुती अपघातात भाजल्यामुळे त्यांचे उपचारादरम्यान काल निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, अभ्यास करत असताना बाथरूममध्ये ठेवलेले पाणी तापवण्याचे भांडे जास्त गरम झाल्याने, अचानक उकळते पाणी अंगावर सांडले. त्यामुळे तब्बल ८०% भाजल्या झालेल्या अश्विनींना पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने आर्थिक मदतही मिळाली. मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि अखेर त्यांनी प्राण सोडले.

अश्विनींचे जिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न होते. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण खेड तालुका आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांत हळहळ व्यक्त केली जात आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here