पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र थेऊर येथे येत्या २० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान यशवंत कृषी महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे पोस्टर अनावरण आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. अजित दादा पवार यांच्या हस्ते पार पडले. या वेळी दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस, मुंबई महापौर केसरी मा. पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे यांनी उपस्थितांना माहिती दिली.
या कृषी महोत्सवाचे आयोजन श्री यशवंत सहकारी साखर कारखाना शेजारील मैदानावर करण्यात येणार आहे. महोत्सवात कृषी, औद्योगिक, गृहोपयोगी वस्तू,अॅटोमोबाईल्स, शेतकी अवजारे यांचे भव्य प्रदर्शन होणार असून, विशेष आकर्षण म्हणून राज्यस्तरीय पशुपक्षी प्रदर्शन देखील आयोजित करण्यात येणार आहे.
मा. पै. आबा काळे यांनी सांगितले की, “या प्रदर्शनात विविध शासकीय संस्था सहभागी होणार असून शेतकरी बांधवांना आधुनिक शेती व तंत्रज्ञानाची माहिती मिळून फायदा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिष्ठानचे सामाजिक उपक्रम
दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठानने आतापर्यंत विविध सामाजिक व जनकल्याणकारी उपक्रम राबवले आहेत. यात –शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर बैलांचा रॅम्प वॉक,महिला सक्षमीकरण कार्यशाळा व उद्योजकता विकास प्रशिक्षण महाराष्ट्र खरेदी जत्रा द्वारे महिलांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे.
गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,आरोग्य महायज्ञ – भव्य आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर रेशनकार्ड दुरुस्ती व आधार नोंदणी शिबिरे.सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
“जनसेवा हीच ईश्वर सेवा” या ब्रीदवाक्याखाली प्रतिष्ठान कार्यरत असून शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत आहे.
यशवंत कृषी महोत्सव २० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत भव्य स्वरूपात होणार असून, शेतकरी बांधवांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
श्रीक्षेत्र थेऊरमध्ये भव्य “यशवंत कृषी महोत्सव २०२५” – शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी!
7