शिवनेत्र मल्टिपर्पज निधी लि. व शिवनेत्र महिला नागरी सहकारी पतसंस्था, दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मोरया मित्र मंडळ, सावंत नगर यांच्या आयोजनातून “होम मिनिस्टर – खेळ रंगला पैठणीचा” हा अनोखा उपक्रम मोठ्या उत्साहात गुरुवारी पार पडला.
महिलांसाठी खास आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला दौंड परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
मजेशीर खेळ, उखाणे आणि गाणी यांच्या रंगतदार फेऱ्यांमुळे वातावरण आनंदमय झाले. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी घेतलेल्या सहभागामुळे स्पर्धेला वेगळेच रंग चढले.
विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महिलांचा उत्स्फूर्त सहभाग व पैठणीच्या झगमगीत परंपरेत सजलेले सोहळ्याचे वातावरण.
होम मिनिस्टर – खेळ रंगला पैठणीचा” स्पर्धा विजेते : पहिले बक्षीस :शीतल गडद,दुसरे बक्षीस:सुप्रिया जगताप,तिसरे बक्षीस : मेघा घुगेकर,उत्तेजनार्थ बक्षीस : निजी सिंग
“गौरी-गणपती सजावट स्पर्धा” विजेते : पहिले बक्षीस : दत्तात्रय पवार (शेतकरी राजा देखावा),दुसरे बक्षीस : ज्योती पासलकर,तिसरे बक्षीस : गीता शिंदे / स्वामिनी खानविलकर,चौथे बक्षीस : अमृता वाघमारे,पाचवे बक्षीस : मेघा घुगेकर
या कार्यक्रमांमुळे महिलांना एकत्र येऊन आपली कला, सर्जनशीलता आणि परंपरेशी असलेले नाते व्यक्त करण्याची संधी मिळाली. पैठणीच्या झगमगाटात रंगलेल्या “होम मिनिस्टर” स्पर्धेने हशा आणि आनंदाचे क्षण दिले तर गौरी-गणपती सजावटीने पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवले.
विजेत्यांना स्थानिक उद्योजक, व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. महिलांच्या प्रचंड प्रतिसादामुळे आयोजक मंडळाचे कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक जतनाला बळ मिळते, असे मत आयोजकांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन,मार्गदर्शन अक्षय भोसले,अनिकेत टेकवडे, सचिन काकडे,स्वप्निल पवार, प्रतीक खोमणे, अमोल चोरमले यांनी योग्य प्रकारे पार पाडले.
