पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने श्रीक्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथे दिनांक २० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत यशवंत कृषी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे.
उद्घाटन प्रसंगी हवेली तालुक्याचे माजी आमदार श्री. रमेश आप्पा थोरात, माजी आमदार श्री. अशोक बापू पवार, श्री. सुरेश आण्णा घुले, श्री. संदीप शेठ धुमाळ, श्री. सचिनतात्या तुपे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व प्रतिष्ठानचे अध्यक्ष पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे यांनी सांगितले की, प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू झाली असून, या कृषी महोत्सवात आंतरराष्ट्रीय पीक पद्धतीबरोबरच पशुपक्षी प्रदर्शनाचाही समावेश करण्यात आला आहे.
महोत्सवात जवळपास २०० स्टॉल्स उभारण्यात येणार असून त्यामध्ये –आंतरराष्ट्रीय शेती अवजारे, बियाणे, कीटकनाशके,हरितगृहे, कृषी जैविक तंत्रज्ञान
हॉर्टिकल्चर, मासेमारी, अक्वाकल्चर, डेअरी तंत्रज्ञान
शेतमाल प्रक्रिया उद्योग, वेअरहाऊस,अपारंपरिक ऊर्जा, विपणन तंत्रज्ञान, कृषी बाजार,अर्थसाहाय्य संस्था, सेंद्रिय शेती,शेळी-मेंढी पालन, समूह शेती, शेतकरी बचत गट, दुग्धविकास अशा विविध क्षेत्रांवरील आधुनिक माहिती व मार्गदर्शन शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.
या निमित्ताने कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शेतकरी, महिला व कृषिकन्या यांना आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या आयोजनासाठी कल्याणकर इव्हेंट मॅनेजमेंटचे श्री. प्रशांत कल्याणकर, सौ. सीमा कल्याणकर, श्री. ऋतुराज जवंजाळ तसेच प्रतिष्ठानचे समन्वयक श्री. बापू सोनवणे उपस्थित होते.

शेतकरी व नागरिकांनी या भव्य कृषी महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
