श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, दौंड यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात दिनांक २० एप्रिल २०२५ पासून २५ एप्रिल २०२५ पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचा १४७ वा श्री स्वामी समर्थ निजानंदगमन महोत्सव अत्यंत भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात रविवारी (दि.२०/०४/२०२५) रोजी प्रा. दिपक देशपांडे यांचे हास्य कल्लोड विनोदी कार्यक्रम झाला. पुढील दिवशी प्रकाश काळे यांनी “प्रबोधन व प्रवचन सेवा” सादर केली. मंगळवारी (दि.२२/०४/२०२५) चारुदत्त आफळे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या संख्येने भाविकांनी ऐकला.
बुधवारी (दि.२३/०४/२०२५) स्वामी गीतांच्या कार्यक्रमाद्वारे योगेश तपस्वी यांनी भक्तिपथावर सादरीकरण केले. गुरुवारी (दि.२४/०४/२०२५) आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज आणि प्रेमानंद शास्त्री यांचे कीर्तन २५/०४/२०२५ रोजी संगीतमय स्वामी चरित्र प्रवचन झाले.
सोहळ्याचा मुख्य दिवस, पुण्यतिथी दिनांक २५/०४/२०२५ रोजी सकाळी १० वाजता महापूजा व दुपारी १२.३० वाजता महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी परमपूज्य श्री गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्या हस्ते स्वर्गीय केशवरो कटके वेद पाठशाळेचे भूमी पूजन करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये विविध मान्यवर व्यक्तींची उपस्थिती होते
डॉ. आनंद नांदेडकर (सुप्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ),अक्षय गोडसे(विश्वस्त दगडू शेठ हलवाई गणपती ), सिद्धार्थ गोडसे(उत्सव समिती प्रमुख दगडू शेठ हलवाई गणपती पुणे),अर्जुन म्हस्के राजलक्ष्मी शिवणकर(कमांडट एसआपि गट ७),सतिश शिवनकर
यां सर्वांच्या हस्ते दुपारची महाआरती झाली व तसेच महाप्रसादाचे वितरण संस्थेमार्फत करण्यात आले.
माजी आमदार रंजनाताई कुल व कृषी उत्पन्न समिती सभापती गणेश जगदाळे यांनी पण उपस्थिती दर्शवली.
तसेच इतर अनेक मान्यवर व हजारो भाविकांनी सहभाग नोंदविला.
सोहळ्याचे यशस्वी आयोजन वैभव (महाराज) कांबळे, संस्थापक अध्यक्ष श्री सद्गुरु स्वामी समर्थ सेवा संस्था दौंड, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.