Home लेटेस्ट न्यूज पुणेकरांना मिळणार पाणी मुळशी धरणातून: चंद्रकांत पाटील!

पुणेकरांना मिळणार पाणी मुळशी धरणातून: चंद्रकांत पाटील!

by sandy
0 comments

पुण्यात वाढती लोकसंख्या आणि त्यासोबत पाण्याची वाढती मागणी पाहता चार धरणांमधून होणारा पाणीपुरवठा देखील अपुरा पडत आहे. त्यामुळे पुणेकरांना आता मुळशी धरणातून पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव विचारात घेतला असून त्यावर लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी कोथरूड येथे पार पडलेल्या विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवठा प्रमाणाचा आढावा घेतला आणि त्यावेळी त्यांनी या प्रकल्पाविषयी माहिती देखील दिली. ही पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी ठरू शकेल!


हा आढावा घेताना त्यांच्यासोबत पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, अधीक्षक अभियंता श्रीकांत वायदंडे,प्रसन्नराघव जोशी, कार्यकारी अभियंता विनोद क्षीरसागर, उप अभियंता प्रशांत कदम, कनिष्ठ अभियंता गणेश काकडे हे सदस्य देखील उपस्थित होते. पुण्यामध्ये मुळशी धरणातून पाणीपुरवठा होणार असल्याचा प्रकल्प यामध्ये समान पाणीपुरवठा प्रकल्प अंतर्गत पुणे शहरात १४१ झोन निश्चित केले असून त्यामधील कोथरूड विधानसभा मतदारसंघात एकूण १७ झोन आहेत. पाणीपुरवठ्याच्या आवश्यकतेनुसार नव्या जलवाहिन्या टाकून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. कोथरूड मतदारसंघामधील १७ झोनमधील १६ नवीन पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्ण झाले असून आयडियल कॉलोनीत टाकीच्या जागेबाबत पुणे महापालिकेमध्ये वाद सुरु असल्याची माहिती मिळत आहे. हा वाद या कामामध्ये अडथळा ठरत आहे. 


समान पाणीपुरवठा प्रकल्प अंतर्गत कोथरूडमध्ये २८ हजार ३९७ पाण्याचे मीटर बसवण्याचा प्रस्ताव आहे त्यापैकी २३ हजार २०९ मीटर बसवण्याचे काम पार पडले असल्याचे वर्तवले जात असून उर्वरित काम लवकरच पूर्णत्वास जाईल असे देखील सांगण्यात येत आहे. पुणेकरांना पाच टीएमसी पाणीपुरवठा होण्यासाठी मुळशी धरणाची उंची देखील वाढवण्यात येणार आहे. यामुळे जो पाण्याचा अतिरिक्त फुगवटा होईल त्यातून पुणेकरांना पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. या बातमीने पुणेकरांनी पाणी पुरवठ्याबाबत सुस्कारा सोडला आहे!


पुणे शहराला सध्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा होत असे, परंतु पुण्यात पाणीपुरवठ्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवू लागली आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातही इतरत्र लोकसंख्या वाढत असल्याचे निदर्शनात येऊन लोकांना पाण्याचा पुरवठा अत्यंत कमी होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत, आणि म्हणूनच ज्या चार धरणांमधून पाणीपुरवठा  यामुळेच मुळशी धरणाचा प्रकल्प उदयास येत आहे. मुळशी धरण टाटा कंपनीच्या मालकीचे असल्याने टाटा कंपनीकडून मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी पुरवठा करण्यात येण्याची मंजुरी देण्यात आली आहे. यावेळी टाटांमुळे पुण्यातील पाण्याचा गंभीर प्रश्न सुटणार असे म्हटले तर त्यात वावगे ठरणार नाही!

पुणेकरांना पाच टिएमसी पाणी मिळण्यासाठी मुळशी धरणाची उंची वाढवण्यात येणार आहे. यामुळे जो पाण्याचा अतिरिक्त फुगवटा होईल, त्यातून पुणे शहराला पाणी देता येणार आहे. धरणाची १ मीटरने उंची वाढवल्यानंतर हे पाणी मिळणार आहे. अजित पवार यांनी यासंदर्भात जलसंपदा विभागाची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव टाटा कंपनी व राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले. हा प्रकल्प लवकरच साकार होऊन पुण्यातील पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे सांगितले जात आहे. ( माहिती स्रोत: लोकमत )

You may also like

Leave a Comment

Search Here