Home क्राइम बिर्याणी संपल्याच्या कारणातून थेट वेटरवर ब्लेडने वार !

बिर्याणी संपल्याच्या कारणातून थेट वेटरवर ब्लेडने वार !

by krushna
0 comments

लातूर जिल्ह्याच्या उदगीर शहरात एक हॉटेल मध्ये बिर्याणी संपल्याच्या कारणातून एका वेटरला चार जणांनी बेदम मारहाण केली आहे.

आरोपींनी बिर्याणी संपल्याच्या कारणातून वेटरवर थेट ब्लेडने वार केले आहेत. नराधम चारी आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी वेटरला दगड, विटा डोक्यात घालून गंभीर जखमी केलं आहे.

सुनील रामराव राठोड असं मारहाण झालेल्या वेटरचं नाव आहे. तर पंकज राठोड, राजू राम राठोड, नबू श्याम जाधव, विशाल रंगनाथ चव्हाण अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे चारही जण उदगीर शहाराच्या संजयनगर भागात राहतात. या सर्वांविरोधात पोलिसांनी मारहाणीसह जीवे मारण्याचा प्रयत्न अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

You may also like

Leave a Comment

Search Here