68
नागपूरच्या शासकीय महाविद्यालय-रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागात असिस्टंट प्रोफेसर असलेल्या महिलेची हत्या करण्यात आली आहे.
महिला प्रोफेसरचा मृतदेह त्यांच्याच घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळल्यामुळे खळबळ माजली आहे. महिलेच्या डोक्यावर रॉडने वार करून तिची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
हुडकेश्वर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. मृत अर्चना यांचा मुलगा हादेखील करीमनगर येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. चोरीच्या उद्देशाने अर्चना यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी पोलीस आजूबाजूच्या परिसरातले सीसीटीव्हीही तपासत आहेत.