दौंड शहरात अवैध जुगार आणि गावठी दारू विक्रीवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या निर्देशानुसार, निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 18 आणि 19 मार्च रोजी शहरातील विविध भागांमध्ये धाडी टाकण्यात आल्या.
18 मार्चला शालीमार चौक व घंटाचाळ भागात कल्याण मटका जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी विल्यम अंतोनी आरीकम, विकी चव्हाण, अतुल कांबळे आणि अनिल सोनवणे यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
19 मार्चला वडार गल्ली, गोवा गल्ली, गांधी चौक आणि कुरकुंभ मोरी भागात गावठी दारू विक्री व जुगार अड्ड्यांवर धाडी टाकण्यात आल्या. यात मुक्ता गायकवाड, कल्पना जाधव, मुन्ना शेख, अशोक गुपुते, शुभम वांभिरे, आकाश मेगनकेरी आणि सोहेल सय्यद यांच्यावर कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी पुढेही अशा कारवाया सुरूच राहतील, असे स्पष्ट केले आहे.