Home लेटेस्ट न्यूज मुंबई येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला भुसावळ येथे अटक।

मुंबई येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला भुसावळ येथे अटक।

by sandy
0 comments

उद्योगनगरी एक्सप्रेसमधून घेतले ताब्यात

भुसावळ – शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन चे निरीक्षक राहुल वाघ यांना गोपनीय माहिती मिळाली की, दिंडोशी पोलिस स्टेशन, मुंबई येथील खुनाचे दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी उद्योगनगरी एक्सप्रेस ने गुन्हा करून पळून जात आहे. तात्काळ पथकास दालनात बोलावून रेल्वे स्थानकावर पाचारण केले व रेल्वे सुरक्षा बल विभागाचे अधिकाऱ्यांच्या मदतीने संयुक्त कारवाई करून मुंबई येथील खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीस भुसावळात ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.शिवदास कुमार यादव असे संशयितांचे नाव आहे. दरम्यान मयत इसम नामे चंद्रशेखर चौहान (वय ३५) राहणार हमु लाल पाडा जनरल,एके वैद्यमार्ग, गोकूळधाम, गोरेगाव पु. मुंबई यास शाहरुख खान व रंजु चौहान यांच्या प्रेमसंबंधाबाबत माहिती झाल्याने तो प्रेमसंबंधात अडथळा निर्माण झाल्याने संशयित रंजु चौहान, शाहरुख खान, मैन्नोद्दीन खान, शिवदा अशांनी मिळून संगनमतीने कट रचून चंद्रशेखर चौहान यांचा राहत्या घरामध्ये गळा दाबून आवळून खून केल्याची घटना ता. १५ मार्च रोजी पहाटे पावणे तीन वाजेला घडली. यासंदर्भात ता.१८ रोजी तुषार तानाजी सारंग राहणार ४१५,सी. विंग जय हनुमान सोसायटी, कोकणीपाडा, कुरार गाव, मलाड पूर्व यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध दिंडोशी पोलिस स्टेशन, मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी इसम नामे शिवदास उद्योगनगरी एक्सप्रेस ने गुन्हा करून पळून जात आहे असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशन चे निरीक्षक राहुल वाघ यांना मिळताच गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बागुल, पो उप निरी. मंगेश जाधव, पोलीस हवालदार योगेश माळी व अमर आढाळे तसेच रेल्वे सुरक्षा बल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने संयुक्त कारवाई करून सदर संशयित आरोपीस ताब्यात घेतले व दिंडोशी पोलीस स्टेशनांच्या स्वाधीन केले.

You may also like

Leave a Comment

Search Here