भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निमित्ताने जय्यत तयारी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला दिलेल्या निर्देशांमध्ये प्रमुखतः उष्णतेपासून संरक्षणासाठी मंडप उभारण्याची व्यवस्था, थंड पाण्याच्या सोयी, वाहतूक पोलिसांनी योग्य नियंत्रण ठेवण्याचे आदेश, दादर स्टेशन ते चैत्यभूमी पर्यंत अतिरिक्त BEST सेवा पुरविणे, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे आणि संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी यांचा समावेश केला आहे.
राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर येतात. त्यामुळे भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
या अनुषंगाने राज्यभरातील विविध ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. याशिवाय, सामाजिक संघटनांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, सर्व स्तरांवर यासाठी नियोजन पूर्ण करण्यात आले आहे.