Home लेटेस्ट न्यूज दौंड नगरपालिकेविरुद्ध शिवजयंती उत्सव समितीचा निषेध मोर्चा – प्रशासनावर गंभीर आरोप

दौंड नगरपालिकेविरुद्ध शिवजयंती उत्सव समितीचा निषेध मोर्चा – प्रशासनावर गंभीर आरोप

by sandy
0 comments

दौंड – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे दौंड शहरात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. मात्र यंदा नगरपालिकेच्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शिवजयंती उत्सव समिती आणि शिवस्मारक समिती व नागरिकन मध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

शिवजयंती मिरवणुकीदरम्यान गावातील मुख्य रस्त्यावरील लाईट अचानक बंद करण्यात आली होती, ज्यामुळे मिरवणुकीस अडथळा निर्माण झाला. तसेच, पालिकेमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी एकही प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहिला नाही, ही बाब विशेष खटकणारी होती.

या निष्काळजीपणाविरोधात आज शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने नगरपालिकेवर निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत विविध घोषणा देण्यात आल्या. नागरिक आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अशा प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी केली आहे.

शिवप्रेमी नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर वीरपुरुषांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही आणि यापुढे असंवेदनशील वर्तन केल्यास मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडले जाईल

You may also like

Leave a Comment

Search Here