Home क्रीड़ा काय घडले भारत विरुद्ध पाकिस्तान आयसीसी सामन्यात? जाणून घ्या… 

काय घडले भारत विरुद्ध पाकिस्तान आयसीसी सामन्यात? जाणून घ्या… 

by sandy
0 comments

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवार, दि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५’ मध्ये रंगला. यावेळी भारताने सहा विकेट्सने पाकिस्तानवर विजय मिळवला. हा सामना दुबईमध्ये पार पडला असून हा एकदिवसीय सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी भारतीय टीमचा खेळाडू विराट कोहली याने शतक पूर्ण करून भारताला विजयाच्या पथावर नेऊन ठेवले. या सामन्याद्वारे विराट कोहलीने त्याचे ५१ शतक पूर्ण केले आहे. 

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ हा सामना १९ फेब्रुवारीपासून सुरु झाला आहे. पण सर्व प्रेक्षकांचे लक्ष मात्र या रविवार, दि. २३ फेब्रुवारीच्या सामन्याने वेधलं होतं. भारत विरुद्ध पाकिस्तान अशी कक्रिकेटमधील चुरस खेळाडू तसेच प्रेक्षकांची आतुरता शिगेला पोहोचवते यात काही शंका नाही. या सामन्यापूर्वीच अनेक गोष्टी या सामन्या बाबत घडू लागल्या होत्या. कुणी म्हणत होतं की पाकिस्तान जिंकणार, तर कुणी त्यावर आवर्जून प्रत्युत्तर देत होते. यामुळे या सामन्यासाठी असलेली आतुरता आणखी वाढली. हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली आणि प्रेक्षकस्थान तुडुंब भरले. 

सामन्यात टॉस पाकिस्तान टीम जिंकली आणि त्यानुसार त्यांनी प्रथम फलंदाजीची निवड केली. पाकिस्तान टीमने ४९ ओव्हर आणि चार बॉलमध्ये २४१ धावा केल्या असून भारत टीमला जिंकण्यासाठी २४२ धावांची गरज होती. यावेळी भारत टीमने ४२ ओव्हर्समध्ये २४४ धावा पटकावत पाकिसनला पराभूत केले. या सामन्यात भारतीय टीमचा खेळाडू विराट कोहली याने १०० धावा करत शतक गाजवले आणि तो मॅन ऑफ द मॅच ठरला! श्रेयस अय्यरने ५६ धावा केल्या तर शुभमन गील ४६ धावा करण्यात यशस्वी ठरला. शाहिद आफ्रिदी याने दोन विकेट्स घेतल्या तर अबरार अहमद आणि खुसदिल शाह यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भारतीय टीमचा कॅप्टन रोहित शर्मा याच्या अधिपत्याखाली हा सामना खेळण्यात आला असून भारताने बॅटिंग ( फलंदाजी ), बॉलिंग ( गोलंदाजी ) आणि फिल्डिंग याच्या हटके अंदाजाने पाकिस्तान टीमला पराभूत केले. भारताच्या संपूर्ण टीमच्या अतिशय रोमांचक खेळामुळेच हे यश भारतीय टीमच्या पदरी पडले आहे. 

या सामन्याबद्दल असलेली प्रेक्षकांची आतुरता आनंदात परिवर्तित झाली. अनेक प्रेक्षकांनी त्यांचा आनंद स्टेडियमच्या आवारात व्यक्त केला तर अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या आनंदसोबतच आणि भारतीय क्रिकेट टीमबद्दलचे प्रेम देखील व्यक्त केले. सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु होती ती म्हणजे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सामन्यामध्ये भारताचा पाकिस्तानवर मिळवलेला विजय!

रविवारच्या भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचचे अपडेट्स?

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवार, दि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५’ मध्ये रंगला. यावेळी भारताने सहा विकेट्सने पाकिस्तानवर विजय मिळवला. हा सामना दुबईमध्ये पार पडला असून हा एकदिवसीय सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी भारतीय टीमचा खेळाडू विराट कोहली याने शतक पूर्ण करून भारताला विजयाच्या पथावर नेऊन ठेवले. या सामन्याद्वारे विराट कोहलीने त्याचे ५१ शतक पूर्ण केले आहे. 

भारताने पाकिस्तानवर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सामन्यात विजय कसा मिळवला?

सामन्यात टॉस पाकिस्तान टीम जिंकली आणि त्यानुसार त्यांनी प्रथम फलंदाजीची निवड केली. पाकिस्तान टीमने ४९ ओव्हर आणि चार बॉलमध्ये २४१ धावा केल्या असून भारत टीमला जिंकण्यासाठी २४२ धावांची गरज होती. यावेळी भारत टीमने ४२ ओव्हर्समध्ये २४४ धावा पटकावत पाकिसनला पराभूत केले. या सामन्यात भारतीय टीमचा खेळाडू विराट कोहली याने १०० धावा करत शतक गाजवले आणि तो मॅन ऑफ द मॅच ठरला! श्रेयस अय्यरने ५६ धावा केल्या तर शुभमन गील ४६ धावा करण्यात यशस्वी ठरला. शाहिद आफ्रिदी याने दोन विकेट्स घेतल्या तर अबरार अहमद आणि खुसदिल शाह यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भारतीय टीमचा कॅप्टन रोहित शर्मा याच्या अधिपत्याखाली हा सामना खेळण्यात आला असून भारताने बॅटिंग ( फलंदाजी ), बॉलिंग ( गोलंदाजी ) आणि फिल्डिंग याच्या हटके अंदाजाने पाकिस्तान टीमला पराभूत केले. भारताच्या संपूर्ण टीमच्या अतिशय रोमांचक खेळामुळेच हे यश भारतीय टीमच्या पदरी पडले आहे.

Leave a Comment

Search Here