शिक्षण क्षेत्रात अनेक बदल घडत असतात त्याप्रमाणेच यंदाच्या वर्षी नवीन धोरण शैक्षणिक क्षेत्रात घोषित करण्यात आला आहे. या धोरणेस मान्यता मिळाल्यास शैक्षणिक वर्ष जूनपासून नाही तर १ एप्रिलपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासूनच करण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे. या निर्णयाबाबत शाळांना देखील सूचित करण्यात आले आहे आणि हा निर्णय पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व शिक्षण अधिकारी तसेच उपसंचालक यांनी जिल्हा आणि तालुका स्तरावर काम सुरु केले असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. पुण्यात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारती येथे आयोजित आढावा बैठकीपूर्वी पंकज भोयर यांनी ही बाब स्पष्ट केली. यावेळी शिक्षणात सीबीएसई धोरण देखील राबवण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
या निर्णयानुसार शाळांच्या एकूण वार्षिक वेळापत्रकात तसेच अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहे आणि त्याला अनुसरून आखणी करण्याची देखील शिफारस करण्यात आली आहे. यावेळी या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास सर्वात मोठा बदल म्हणजे शाळा आता १५ जून नव्हे तर १ एप्रिलपासून सुरु होण्याची शक्यता आहे.
नव्या धोरणानुसार राज्य सरकारने इयत्ता तिसरी ते बारावी शालेय अभ्यासक्रमात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एससीईआरटीने म्हणजेच राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा बदलणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्याच्या शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाची दिशा ठरवणारा अभ्यासक्रम जाहीर झाला असून मे महिन्यात या अभ्यासक्रमाचा मसुदा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी शाळांचे वार्षिक वेळापत्रकात बदल करून ‘सीबीएसई’ नुसार त्याची आखणी करावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे.
राज्य अभ्यासक्रमाच्या आराखड्यात वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येणार असून याचा परिणाम वार्षिक सुट्ट्यांवर देखील पडणार असल्याचे दिसून येत आहे. या धोरणामध्ये दीर्घकालीन सुट्ट्या न देता शाळेतच अध्ययन – अध्यापनाची प्रक्रिया सुरु ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. ३१ मार्च रोजी वार्षिक परीक्षेचा निकाल त्यानंतर पुन्हा १ एप्रिलपासून शैक्षणिक वर्षाची सुट्टी, संपूर्ण मे महिना उन्हाळ्याची सुट्टी आणि लगेचच १ जूनपासून पुन्हा शाळा सुरु करण्यात यावी अशी शिफारस या धोरणात करण्यात आली आहे. या बदलत्या शैक्षणिक वर्षाला अनुसरून चाचणी परीक्षा, सहामाही तसेच वार्षिक परीक्षांमध्ये देखील बदल होण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात येते. स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसाठी सक्षम व्हावं या उद्देशाने हे सर्व बदल होणार असल्याचे वर्तवले जात आहे.
शिक्षण क्षेत्रातील मोठा बदल कोणता?
या धोरणेस मान्यता मिळाल्यास शैक्षणिक वर्ष जूनपासून नाही तर १ एप्रिलपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासूनच करण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे. या निर्णयाबाबत शाळांना देखील सूचित करण्यात आले आहे आणि हा निर्णय पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व शिक्षण अधिकारी तसेच उपसंचालक यांनी जिल्हा आणि तालुका स्तरावर काम सुरु केले असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.
सीबीएसईला अनुसरून बदल करण्यामागे उद्देश काय?