Home लेटेस्ट न्यूज शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता!

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता!

by sandy
0 comments

केंद्रसरकार दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचा निधी देत असून राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे ‘नमो किसान सन्मान निधी योजने’ अंतर्गत ६ हजार रुपये देते. यावेळी १९व्या हफ्त्याचे निधीवाटप करताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या ६ हजार रुपयांमध्ये आणखी ३ हजारांची वाढ होणार असल्याचे यावेळी घोषित करण्यात आले. 

सोमवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर, बिहार या ठिकाणी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’च्या १९व्या हप्त्याचे वितरण झाले. या वाटपाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामतीत पार पडला. 

केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांना ६ हजाराचा निधी देत असून राज्य सरकार देखील दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपये निधीद्वारे देते, परंतु या सोमवारच्या वाटपदरम्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच शेतकऱ्यांना एक आनंदवार्ता देऊन त्यांना सुखावले आहे. आजवर राज्य सरकारद्वारे मिळत असलेल्या ६ हजाराच्या सन्मान निधीमध्ये आता तीन हजाराची वाढ झाली असल्याची माहिती या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे देण्यात आली आहे. राज्य शासन ‘नमो किसान सन्मान निधी’द्वारे वर्षाकाठी ६ हजार रुपये देते. राज्य शासन यात ३ हजार रुपयांनी वाढ करणार असून राज्याचे ९ हजार आणि केंद्राचे ६ हजार असे आता वर्षाला १५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

केंद्र सरकार तसेच राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी ही योजना महाराष्ट्रात १ डिसेंबर २०१८ रोजी राबवण्यात सुरुवात झाली. ज्या शेतकऱ्यांकडे २ हजार हेक्टरपर्यंत शेती असेल, त्या कुटुंबाला या योजनेत सहभागी होता येते. संपूर्ण भारतात ही योजना सुरु असून लाभार्थ्यांची संख्या ही १४.५ करोड रुपये इतकी आहे. जमीन धारण करणारी संस्था, संवेधानिक पद धारण केलेली आजी माजी व्यक्ती, आजी माजी सर्व मंत्री, आजी माजी आमदार खासदार, आजी माजी महापौर जि. प.अध्यक्ष, आयकर भरणारी व्यक्ती, निवृत्ती वेतन १० हजार पेक्षा जास्त घेणारी व्यक्ती तसेच नोंदणीकृत डॉक्टर वकील अभियंता हे नागरिक या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरतात. 

आपण जर या योजनेसाठी पात्र असाल आणि अजूनही यापासून वंचित असाल तर आपणही यात सहभागी होऊ शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील माहिती नक्की वाचा… 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज कसा करावा?  

  • सर्व प्रथम, अर्जदारास योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर मुख्यपृष्ठ संगणकाच्या स्क्रीनवर तुमच्यासमोर उघडेल.
  • या मुख्य पृष्ठावर आपल्याला ‘शेतकरी कॉर्नर’ हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा, या पर्यायामध्ये तुम्हाला आणखी तीन पर्याय दिसतील.
  • यापैकी तुम्हाला ‘नवीन शेतकरी नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन शेतकरी नोंदणी फॉर्म उघडेल.
  • या फॉर्ममध्ये आपल्याला आपला आधार नंबर, प्रतिमा कोड भरावा लागेल आणि विचारलेल्या सर्व माहिती पूर्ण कराव्या लागतील.
  • सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला ‘सबमिट’ बटणावर क्लिक करावे लागेल.
  • पुढे, नोंदणी फॉर्मची एक प्रिंट आउट घ्या आणि भविष्यासाठी जतन करा.
  • अशा प्रकारे आपला अर्ज पूर्ण होईल.

You may also like

Leave a Comment

Search Here