Home लेटेस्ट न्यूज अदानी विकत घेणार अंबानींची दिवाळखोर कंपनी!

अदानी विकत घेणार अंबानींची दिवाळखोर कंपनी!

by sandy
0 comments

शेयर मार्केटची मोठी बातमी…

अदानी पॉवर लिमिटेड कंपनीतर्फे सर्वात मोठी आणि खळबळ जनक बातमी स्पष्ट झाली आहे. अंबानी समूहाच्या रिलायन्स पॉवरची ‘विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड ( VIPL ) ही साहाय्यक कंपनी खरेदी करण्यासाठी अदानी समूहातर्फे सोमवार, दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी लेटर ऑफ इंटेन्ड ( LOI ) म्हणजेच आशयपत्र मिळाले आहे. ही शेयर मार्केटमधील आजची सर्वात मोठी बातमी ठरत आहे. 

VIPL ही अंबानींची कंपनी महाराष्ट्रातील बुरीबोटी, नागपूर येथील MIDC औद्योगिक क्षेत्रात 600 मेगावॉटची थर्मल पॉवर प्लांट चालवते. हा प्रकल्प सध्या दिवाळखोरी ( loss ) प्रक्रियेतून जात आहे. अडानी पॉवरने या प्रकल्पाला विकत घेण्यासाठी कर्जदार समितीची ( COC ) मंजुरी मिळवली आहे, परंतु या प्रक्रियेची अंतिम अंमलबजावणी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) आणि इतर नियामक प्राधिकरणांच्या मंजुरीवर आधारित आहे. या खरेदीमुळे अडानी पॉवरची (थर्मल पॉवर) उत्पादन क्षमता वाढेल, ज्यामुळे पॉवर क्षेत्रातील त्यांची स्थिती मजबूत होईल. या प्रकल्पाच्या अधिग्रहणासाठी अंदाजे २४०० ते ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.

या खरेदीमुळे रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये चढउतार दिसून आले आहेत. या बातमीच्या प्रकाशनानंतर रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये ५ टक्के वाढ झाली आहे. टीम अडानी आणि टीम अंबानी यांच्यातील चुरस आणखी वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः पॉवर क्षेत्रात हे घडणे शक्य आहे. दोन्ही समूह ग्रीन एनर्जी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत, ज्यामुळे भविष्यात ही चुरस आणखी वाढण्याची शक्यता वर्तवता येईल.

अंबानींची ही दिवाळखोर कंपनी खरेदीनंतर अडानी पॉवरच्या आर्थिक स्थितीवर सकारात्मक परिणाम होईल, ज्यामुळे त्यांच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, या प्रकल्पाच्या खरेदीमुळे अडानी पॉवरच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल, ज्यामुळे त्यांच्या महसुलातही वाढ होण्याची अपेक्षा आहे. अडानी पॉवर आणि रिलायन्स पॉवर यांच्यातील स्पर्धा आणखी तीव्र होईल, ज्यामुळे दोन्ही कंपन्या त्यांच्या सेवा आणि उत्पादनांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी अधिक प्रयत्न करतील.

या घटनेमुळे अदानी पॉवरचा निव्वळ नफा ७.४ टक्क्यांनी वाढून २,९४० कोटी रुपये झाला आहे. सप्टेंबर २०२४ साली भरलेल्या ३८७२.०४ कोटी रुपयांचे कर्ज यामुळे या तिमाहीत कंपनीचा महसून ५.२ टक्के इतका वाढून १३,६७१.२ कोटी रुपये इतका झाला. यावेळी शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ट्रेडर्स तसेच नागरिकांनी या बातमीचा आढावा घेणं आवश्यक आहे. या बातमीमुळे शेयर मार्केटमध्ये खळबळ माजणार आहे तसेच अनेकांना प्रॉफिट किंवा लॉस याला सामोरे जावे लागणार आहे. या बातमीमध्ये फक्त माहिती देण्यात आली आहे, यावरून गुंतवणूकदारांनी निर्णय घेऊ नये. सावधान राहावे. 

शेयर मार्केटची मोठी बातमी कोणती?

अदानी पॉवर लिमिटेड कंपनीतर्फे सर्वात मोठी आणि खळबळ जनक बातमी स्पष्ट झाली आहे. अंबानी समूहाच्या रिलायन्स पॉवरची ‘विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड ( VIPL ) ही साहाय्यक कंपनी खरेदी करण्यासाठी अदानी समूहातर्फे सोमवार, दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी लेटर ऑफ इंटेन्ड ( LOI ) म्हणजेच आशयपत्र मिळाले आहे. ही शेयर मार्केटमधील आजची सर्वात मोठी बातमी ठरत आहे.

अंबानींची कंपनी विकत घेऊन अदानीला किती फायदा झाला?

या घटनेमुळे अदानी पॉवरचा निव्वळ नफा ७.४ टक्क्यांनी वाढून २,९४० कोटी रुपये झाला आहे. सप्टेंबर २०२४ साली भरलेल्या ३८७२.०४ कोटी रुपयांचे कर्ज यामुळे या तिमाहीत कंपनीचा महसून ५.२ टक्के इतका वाढून १३,६७१.२ कोटी रुपये इतका झाला. यावेळी शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ट्रेडर्स तसेच नागरिकांनी या बातमीचा आढावा घेणं आवश्यक आहे. या बातमीमुळे शेयर मार्केटमध्ये खळबळ माजणार आहे तसेच अनेकांना प्रॉफिट किंवा लॉस याला सामोरे जावे लागणार आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here