जेवणाला पूर्णत्वास नेणारं मीठ आता ठरतंय जीवघेणं! केवळ मिठामुळे दरवर्षी तब्बल १९ लाख लोकांचा मृत्यू होत असल्याचे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन द्वारे सांगण्यात आले आहे. यावेळी त्यांनी आपल्या जेवणात मिठाचे प्रमाण किती असावे याची देखील माहिती दिली आहे. मिठाचे आरोग्याला अनेक फायदे असले तरी त्याचा अतिरेक मात्र आपल्याला जीव गमावण्यास प्रवृत्त करू शकतो. यामुळे जेवणात दैनंदिन जीवनात मिठाचे प्रमाण किती असावे हे माहित करून घेण्यासाठी ही बातमी संपूर्ण वाचावी.
मिठाशिवाय अन्न ग्रहण करण्याचा विचारही करवत नाही ना? मिठाशिवाय अन्न अत्यंत अळणी होतं आणि ते जिभेवरच रेंगाळत राहतं, घशाखाली उतरणं शक्य होत नाही. कारण आपल्या जिभेला चटपटीत, मिठाने युक्त आणि मसालेदार पदार्थ खाण्याची सवय असते. मिठाशिवाय पदार्थाचा एक घासही सहन होत नाही, इतकं मिठाचं रोजच्या जीवनात महत्त्व आहे. परंतु हेच महत्त्वपूर्ण मीठ आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ( WHO ) च्या अभ्यासानुसार मिठाचं जास्त सेवन केल्यामुळे वर्षाला तब्बल १९ लाख लोक आपला जीव गमावत आहेत. मिठाला ‘सायलेंट किलर’ देखील संबोधलं जातं. या मिठाचे शिकार आपण होऊ नये यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ( WHO ) द्वारे रोजच्या जेवणातील मिठाची आकडेवारी देण्यात आली आहे.
रोजच्या जेवणातील मिठाचे प्रमाण:
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ( WHO ) ने आपल्या नव्या गाईडलाईन्स मध्ये स्पष्ट केले आहे की रोजच्या जेवणात केवळ २ ग्रॅम मीठ खाणं आपल्या आरोग्यासाठी योग्य ठरेल. आणि त्यांच्या अभ्यासानुसार साधारणतः लोक दिवसाला ४.३ ग्रॅम इतक्या मिठाचे सेवन करतात. म्हणजे लोक गरजेपेक्षा दुप्पट मोठं आपल्या आहाराद्वारे शरीरात प्रविष्ट करत आहे जे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. आपल्या दैनंदिन जीवनात मिठाचा कमीतकमी वापर करणे आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे आपण आपल्या आहारात बदल करावा असे आवाहन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ( WHO ) द्वार करण्यात आले.
मिठाचे जास्त सेवन केल्यास परिणाम:
योग्य प्रमाणापेक्षा जास्त मीठ खाल्ल्यास आरोग्याविषयी अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता वर्तवता येते. हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग तसेच किडनीसंबंधी अनेक समस्यांना यामुळे तोंड द्यावे लागू शकते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ( WHO )नं नवी गाईडलाईन घोषित करून सोडियम कमी असलेलं मीठ आहारात वापरण्याचं आवाहन केलं आहे. जास्त मीठ असलेल्या म्हणजेच जंक फूड, आऊटसाईड फूड, फास्ट फूड अशा पदार्थांचे सेवन करणे टाळावे असे देखील यावेळी त्यांनी सूचित केले आहे.
मिठानं दरवर्षी १९ लाख लोकांचा मृत्यू:
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ( WHO ) ने दिलेल्या माहितीनुसार आहारात मिठाचे जास्त प्रमाण ठेवल्याने दरवर्षी १९ लाख लोक आपला जीव गमावत आहेत. जे लोक आपल्या जेवणात प्रमाणाहून जास्त मीठ वापरात आहेत त्यांनी मिठाचे प्रमाण ध्यानात ठेवून २ ग्रॅमवर आणावे असा सल्ला WHO नं दिला आहे.
आहारात पोटॅशियम युक्त मीठ वापरा:
आहार हानिकारक न बनवता तो आरोग्यदायी बनवण्यासही आपल्या आहारात पोटॅशियम युक्त मिठाचा वापर करणे योग्य ठरेल. पोटॅशियम युक्त मिठामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते, यामुळे हाय ब्लड प्रेशरचा धोका कमी होतो. आपल्या शरीरात पोटॅशियमची आवश्यकता असते, यामुळं हृदय तंदुरुस्त राहण्यास मदत होते. पोटॅशियम युक्त मिठामुळे हृदयरोग, स्ट्रोक तसेच अकाली निधनाचा धोका टळू शकतो. परंतु पोटॅशियम युक्त मीठ प्रत्येकालाच सुटेबल नसतं. ज्यांना किडनीसंबंधी समस्या आहेत त्यांच्यासाठी पोटॅशियम घातक ठरू शकतं. आहारात कोणताही मोठा बदल हा तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच करण्यात यावा.
जास्त मीठ खाल्ल्याने काय होतं?
योग्य प्रमाणापेक्षा जास्त मीठ खाल्ल्यास आरोग्याविषयी अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता वर्तवता येते. हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग तसेच किडनीसंबंधी अनेक समस्यांना यामुळे तोंड द्यावे लागू शकते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ( WHO )नं नवी गाईडलाईन घोषित करून सोडियम कमी असलेलं मीठ आहारात वापरण्याचं आवाहन केलं आहे. जास्त मीठ असलेल्या म्हणजेच जंक फूड, आऊटसाईड फूड, फास्ट फूड अशा पदार्थांचे सेवन करणे टाळावे असे देखील यावेळी त्यांनी सूचित केले आहे.
कोणते मीठ रोजच्या आहारात योग्य ठरेल?