तरुणपणी ज्यांनी बॉलिवूडमध्ये विविध भूमिका करून प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या एव्हरग्रीन अभिनेत्याचा फिटनेस आजही लोकांना थक्क करतो तब्बल ८२ वर्ष वय असूनही त्यांच्यात एखाद्या तरुणाला लाजवेल असा फिटनेस आहे. या फिटनेसचं रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी अनेक चाहते उत्सुक आहेत. यावेळी एका लोकप्रिय कार्यक्रमात त्यांनी याविषयी थोडीशी माहिती दिल्याचं ऐकिवात आलं आहे. जाणून घेऊ काय आहे हे रहस्य…
बॉलिवूडमधील बिग बी म्हणजेच लोकप्रिय अभितेने अमिताभ बच्चन हे अनेक भूमिका साकारत त्यांच्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. १९६९ पासून अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून ते आजतागायत त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत फक्त वाढ होत आहे, घट कधीच नाही. त्यांच्या अभिनयासह प्रेक्षक त्यांच्या फिटनेसचे देखील फॅन आहेत. परंतु असा फिटनेस मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीत काही बदल करावे लागतात.
अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती हा अनेक वर्ष चालत आहे तसेच प्रेक्षकांची या कार्यक्रमाला भरघोस पसंती मिळत आहे. हा कार्यक्रम अनेक वर्ष प्रेक्षकांच्या ज्ञानात भर घालण्यास यशस्वी ठरत आहे, तसेच अनेक गरजूंना या कार्यक्रमामुळे मदत होत आहे तर अनेक तज्ज्ञांना या प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या ज्ञानाची व्याप्ती लोकांपर्यंत पोहोचवण्यात यश येत आहे. सध्या या कार्यक्रमाचा १६ वा सिझन सुरु आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझन पासून अमिताभ बच्चन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. होस्ट म्हणून अमिताभ बच्चन त्यांच्या समोरील हॉट सीटवर बसणाऱ्या स्पर्धकांशी संवाद साधतात, त्यांना प्रश्न विचारतात तसेच या कार्यक्रमाची धुरा अत्यंत सहज सांभाळतात. या कार्यक्रमात ते खेळासोबतच अनेक गोष्टी शेयर करत असतात. यावेळी एका स्पर्धकाशी साबवड साधताना त्यांनी त्यांच्या डाएटमधील एका घटकाविषयी माहिती सांगितली आहे.
हल्लीच प्रदर्शित झालेल्या KBC – १६ च्या एका भागात हॉटसीटवर चांदनी चौधरी नावाच्या स्पर्धक बसल्या होत्या. त्यांना ३ हजार रुपयांसाठी ‘अवधी जेवणातील “तहरी” हा पदार्थ कोणत्या राज्याशी संबंधित आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर स्पर्धक चांदनी चौधरी यांनी ‘उत्तर प्रदेश’ असं उत्तर दिलं आणि ते अगदी बरोबर देखील निघालं. रुपये ३ हजाराचा पढाव त्यांनी पार केला, परंतु या प्रश्नावरून अमिताभ बच्चन यांना त्यावर बोलावंसं वाटलं. ‘तहरी’ हा पदार्थ तांदळाने बनवला जातो. बिर्याणीसारखा हा पदार्थ असतो पण याला शिजवण्याची पद्धत निराळी असते. अमिताभ बच्चन म्हणाले की त्यांना तहरी हा पदार्थ खूप आवडायचा, परंतु डाएटसाठी त्यांनी भात म्हणजेच तांदूळ वापरून बनवलेले पदार्थ आपल्या आहारातून वर्ज्य केले आहेत.
केवळ फिटनेससाठी त्यांनी आपल्या जेवनातून भात वगळला असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. वय वर्ष ८२ असूनही ते इतके फिट कसे असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नेहमीच पडायचा. त्यांच्या फिटनेसचं हे गुपित त्यांनी सर्व प्रेक्षकांसमोर उघड केलं. संतुलित आहार हे निरोगी आयुष्याचे मोठे कारण आहे. अमिताभ बच्चन यांच्याकडून त्यांच्या चाहत्यांना नेहमीच फिटनेस आणि ऊर्जेची प्रेरणा मिळत असते. आपणही आपल्या जीवनशैलीत असे काही डाएट फॉलो करण्यास सुरुवात करणे आवश्यक आहे. आपले शरीर फिट राहिले तरच आपले आरोग्य सुधारेल.
काय आहे अमिताभ बच्चन यांच्या फिटनेसचं रहस्य?
हल्लीच प्रदर्शित झालेल्या KBC – १६ च्या एका भागात हॉटसीटवर चांदनी चौधरी नावाच्या स्पर्धक बसल्या होत्या. त्यांना ३ हजार रुपयांसाठी ‘अवधी जेवणातील “तहरी” हा पदार्थ कोणत्या राज्याशी संबंधित आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर स्पर्धक चांदनी चौधरी यांनी ‘उत्तर प्रदेश’ असं उत्तर दिलं आणि ते अगदी बरोबर देखील निघालं. रुपये ३ हजाराचा पढाव त्यांनी पार केला, परंतु या प्रश्नावरून अमिताभ बच्चन यांना त्यावर बोलावंसं वाटलं. ‘तहरी’ हा पदार्थ तांदळाने बनवला जातो. बिर्याणीसारखा हा पदार्थ असतो पण याला शिजवण्याची पद्धत निराळी असते. अमिताभ बच्चन म्हणाले की त्यांना तहरी हा पदार्थ खूप आवडायचा, परंतु डाएटसाठी त्यांनी भात म्हणजेच तांदूळ वापरून बनवलेले पदार्थ आपल्या आहारातून वर्ज्य केले आहेत.
अमिताभ बच्चन या वयातही फिट कसे?
तरुणपणी ज्यांनी बॉलिवूडमध्ये विविध भूमिका करून प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या एव्हरग्रीन अभिनेत्याचा फिटनेस आजही लोकांना थक्क करतो तब्बल ८२ वर्ष वय असूनही त्यांच्यात एखाद्या तरुणाला लाजवेल असा फिटनेस आहे. या फिटनेसचं रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी अनेक चाहते उत्सुक आहेत. यावेळी एका लोकप्रिय कार्यक्रमात त्यांनी याविषयी थोडीशी माहिती दिल्याचं ऐकिवात आलं आहे. जाणून घेऊ काय आहे हे रहस्य…
अमिताभ बच्चन यांचं वय किती?
वय वर्ष ८२ असूनही ते इतके फिट कसे असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नेहमीच पडायचा. त्यांच्या फिटनेसचं हे गुपित त्यांनी सर्व प्रेक्षकांसमोर उघड केलं. संतुलित आहार हे निरोगी आयुष्याचे मोठे कारण आहे. अमिताभ बच्चन यांच्याकडून त्यांच्या चाहत्यांना नेहमीच फिटनेस आणि ऊर्जेची प्रेरणा मिळत असते. आपणही आपल्या जीवनशैलीत असे काही डाएट फॉलो करण्यास सुरुवात करणे आवश्यक आहे. आपले शरीर फिट राहिले तरच आपले आरोग्य सुधारेल.