बुधवार, दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक धक्कादायक आणि पुणे जिल्ह्यासाठी लाजिरवाणी अशी घटना घडली आहे. दिवसाढवळ्या सकाळी पावणे सहा ते साडे सहा वाजेच्या दरम्यान एका २६ वर्षीय महिलेवर MSRTC च्या शिवशाही बसमध्ये एका ३७ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची बातमी समोर बातमी समोर आली आहे. यावेळी आरोपी दत्तात्रय रामदास गाडे अजूनही पोलिसांच्या ताब्यात आला नसल्याची माहिती मिळाली आहे. पुणे जिल्ह्यातील डीसीपी स्मार्तना पाटील यांनी या घटनेबाबत माहिती दिली असून पीडित तरुणीची अवस्था आता ठीक असल्याचे देखील सांगितले आहे.
अजून किती ठिकाणं महिलांसाठी धोकादायक ठरणार आहेत? नक्की कोणत्या ठिकाणी महिला सुरक्षित राहू शकतील? असे प्रश्न निश्चित मनात आणणारी घटना म्हणजे २६ फेब्रुवारीला घडलेली बलात्काराची घटना होय. रोज जसे प्रवासी आपल्या निश्चित ठिकाणी जाण्यासाठी बसची स्थानकावर उभे राहून सरकारी बसची वाट पाहत असतात तशीच एक २६ वर्षीय तरुणी
२६ फेब्रुवारीच्या सकाळी ५.४५ ते ६.३० दरम्यान आपल्या बसची वाट पाहत उभी होती. एक ३७ वर्षीय तरुण येतो आणि त्या तरुणीला विचारतो की ‘ताई, कुठे जायचंय तुम्हाला?’ तरुणी म्हणाली ‘फलटणला जायचंय’. तरुण म्हणाला ‘साताऱ्याच्या बस इथे नाही लागत ताई, मला माहित आहेत कुठे लागतात त्या’ तरुणीने उद्गारले की ‘इथेच लागतात दादा बस, मला माहित आहे.’ तरुण काही एके ना, तो म्हणतो, ‘तिथे एक फलटणला जाणारी बस उभी आहे, मी तुम्हाला दाखवतो ताई’ ताई ताई म्हणत त्याने त्या तरुणीचा विश्वास संपादन केला आणि त्या बसपर्यंत घेऊन गेला. बस पाहून मात्र तरुणीला संशय आला, ‘ही बस बंद आहे, बसमधले लाईट्स सुद्धा बंद आहेत’ असं तिने त्या तरुणाला सांगताच तरुण म्हणाला, ‘रात्रीची गाडी आहे ताई म्हणून लाईट्स बंद आहेत, हवं तर तुम्ही आत जाऊन टॉर्च लावून चेक करू शकता’
तरुणीने आपल्या मोबाईलचा टॉर्च चालू केला आणि बसमध्ये शिरली. तोच तो तरुण मागून बसमध्ये चढला आणि दार बंद करून घेतले. दिवसाढवळ्या तिच्यावर अत्याचार केला, बलात्कार केला. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. बस स्थानकावर लोकांची इतकी वर्दळ असून देखील अशी घटना त्या स्थळावर घडू शकते यावर कुणाचा विश्वासच बसत नाही. यावेळी त्या तरुणीवर बलात्कार करून तो आरोपी ११ वाजता त्याच्या घरी गेला, संध्याकाळी ४ ते ५ वाजेच्या दरम्यात त्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी त्या आरोपीला शोधण्याची मोहीम सुरु असून डॉग स्कॉड आणि ड्रोनचा वापर करण्यात येत आहे.
आरोपीच्या कुटुंबाची तसेच त्याच्या माहितीतल्या लोकांची चौकशी करण्यात येत आहे. त्या आरोपीवर पूर्वीपासून आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. हा आरोपी मूळचा शिरूर तालुक्यातील गुनाट या गावचा आहे. स्वारगेट बस स्थानकावर पीडित तरुणीवर या आरोपीने दोन वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यावेळी त्या आरोपीला शोधण्याची मोहीम सुरु असून डॉग स्कॉड आणि ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यात आरोपी पीडित तरुणीला बसेपर्यंत घेऊन गेल्याची घटना स्पष्टपणे दिसत आहे. MSRTC च्या बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये ही घटना घडली आहे.
पुणे बलात्कार घटना अपडेट्स
आरोपीच्या कुटुंबाची तसेच त्याच्या माहितीतल्या लोकांची चौकशी करण्यात येत आहे. त्या आरोपीवर पूर्वीपासून आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. हा आरोपी मूळचा शिरूर तालुक्यातील गुनाट या गावचा आहे. स्वारगेट बस स्थानकावर पीडित तरुणीवर या आरोपीने दोन वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यावेळी त्या आरोपीला शोधण्याची मोहीम सुरु असून डॉग स्कॉड आणि ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यात आरोपी पीडित तरुणीला बसेपर्यंत घेऊन गेल्याची घटना स्पष्टपणे दिसत आहे. MSRTC च्या बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये ही घटना घडली आहे.
पुणे बलात्कार प्रकरण कसे घडले?
रोज जसे प्रवासी आपल्या निश्चित ठिकाणी जाण्यासाठी बसची स्थानकावर उभे राहून सरकारी बसची वाट पाहत असतात तशीच एक २६ वर्षीय तरुणी २६ फेब्रुवारीच्या सकाळी ५.४५ ते ६.३० दरम्यान आपल्या बसची वाट पाहत उभी होती. एक ३७ वर्षीय तरुण येतो आणि त्या तरुणीला विचारतो की ‘ताई, कुठे जायचंय तुम्हाला?’ तरुणी म्हणाली ‘फलटणला जायचंय’. तरुण म्हणाला ‘साताऱ्याच्या बस इथे नाही लागत ताई, मला माहित आहेत कुठे लागतात त्या’ तरुणीने उद्गारले की ‘इथेच लागतात दादा बस, मला माहित आहे.’ तरुण काही एके ना, तो म्हणतो, ‘तिथे एक फलटणला जाणारी बस उभी आहे, मी तुम्हाला दाखवतो ताई’ ताई ताई म्हणत त्याने त्या तरुणीचा विश्वास संपादन केला आणि त्या बसपर्यंत घेऊन गेला. बस पाहून मात्र तरुणीला संशय आला, ‘ही बस बंद आहे, बसमधले लाईट्स सुद्धा बंद आहेत’ असं तिने त्या तरुणाला सांगताच तरुण म्हणाला, ‘रात्रीची गाडी आहे ताई म्हणून लाईट्स बंद आहेत, हवं तर तुम्ही आत जाऊन टॉर्च लावून चेक करू शकता’ तरुणीने आपल्या मोबाईलचा टॉर्च चालू केला आणि बसमध्ये शिरली. तोच तो तरुण मागून बसमध्ये चढला आणि दार बंद करून घेतले. दिवसाढवळ्या तिच्यावर अत्याचार केला, बलात्कार केला.