१४ फेब्रुवारी रोजी जगभरात रिलीज झालेला छावा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर तर अधिराज्य गाजवतोच आहे, परंतु बॉक्स ऑफिसवरही याच सिनेमाची छाप आहे. गेले चौदा दिवस हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक एकच गर्दी करत आहेत आणि या सिनेमाला त्यांची पसंती देखील मिळत आहे. आज या सिनेमाचा बॉक्स ऑफिस कलेक्शनचा १४ वा दिवस आहे. या हाऊसफुल सिनेमाने बॉक्स ऑफिसवर काय छाप पाडली आहे ते पाहूया…
छावा सिनेमा रिलीज होऊन आज तब्बल दोन आठवडे झाले आहेत आणि आजही या सिनेमाला पहिल्या दिवसासारखाच भरगोस प्रतिसाद मिळत आहे. यामागे प्रेक्षकांचं इतिहासावर असलेलं प्रेम आणि छावा सिनेमाच्या टीमची अपार मेहनत आहे यात शंका नाही. सिनेमातील मुख्य भूमिका साकारणारा विकी कौशल, महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत रश्मिका मंदाना आणि औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्ना तसेच सहकलाकार यांचा या यशात फार मोठा वाटा आहे. लक्ष्मण उटेकर यांच्या अत्यंत सुंदर अशा दिग्दर्शनाखाली पार पडलेल्या या सिनेमाची मॅडोक फिल्म्स तर्फे निर्मिती करण्यात आली आहे. शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या ‘छावा’ या कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमाला ए. आर. रहमान चे संगीत मिळाले असल्याने या सिनेमाला आणखीन चार चांद लागले आहेत. दोन आठवडे लोटून देखील या सिनेमाचा दबदबा प्रेक्षकांच्या कुतूहलतेवर आणि बॉक्स ऑफिसवर कायम आहे. संभाजी महाराजांच्या कर्तृत्वावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे आणि त्यांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन देखील अनेक रेकॉर्ड ब्रेक सिनेमांना मागे टाकत आहे.
‘छावा’ सिनेमाचं बजेट १३० कोटी इतके आहे. सिनेमाने रिलीज होण्याच्या पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच सिनेमागृह हाऊसफुल होते. रिलीज डेट पूर्वीच या सिनेमाचे ५ लाख तिकिट्स ऍडव्हान्स बुक झाले होते. यातूनच १३.७० कोटी कमाई झाली आहे. आज हा सिनेमा रिलीज होऊन १४ दिवस झाले आहेत आणि आज या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन ३९८.२५ कोटी इतके आहे. या आकडेवारीत बदल होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. २०२५ मधील हा एक रेकॉर्ड ब्रेक सिनेमा ठरू शकतो. या सिनेमाने ‘स्त्री २’, ‘गदर २’, ‘जवान’ यासारख्या सिनेमांना मागे सोडलं आहे. यावेळी या सिनेमाद्वारे अनेक रेकॉर्ड ब्रेक करण्यात येऊ शकतात अशी शंका आहे.
‘छावा’ सिनेमा अनेक प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणत आहे. १६८० ते १६८९ या ऐतिहासिक काळाची अनुभूती करून देणारा हा सिनेमा अनेकांच्या मनात घर करत आहे. या सिनेमादरम्यान प्रेक्षकांद्वारे होणाऱ्या शिवगर्जना सोशल मीडियावर अक्षरशः व्हायरल होत आहेत. अनेक प्रेक्षक या सिनेमाबद्दल आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत. पहिल्या दिवसापासून ते आजतागायत या सिनेमाबाबतचं प्रेक्षकांचं कुतूहल तितक्याच ऊर्जेने वाढताना दिसत आहे.
छावा सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?

छावा सिनेमाला किती पसंती मिळत आहे?
‘छावा’ सिनेमा अनेक प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणत आहे. १६८० ते १६८९ या ऐतिहासिक काळाची अनुभूती करून देणारा हा सिनेमा अनेकांच्या मनात घर करत आहे. या सिनेमादरम्यान प्रेक्षकांद्वारे होणाऱ्या शिवगर्जना सोशल मीडियावर अक्षरशः व्हायरल होत आहेत. अनेक प्रेक्षक या सिनेमाबद्दल आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत. पहिल्या दिवसापासून ते आजतागायत या सिनेमाबाबतचं प्रेक्षकांचं कुतूहल तितक्याच ऊर्जेने वाढताना दिसत आहे.
छावा सिनेमातील कलाकार?
छावा सिनेमा रिलीज होऊन आज तब्बल दोन आठवडे झाले आहेत आणि आजही या सिनेमाला पहिल्या दिवसासारखाच भरगोस प्रतिसाद मिळत आहे. यामागे प्रेक्षकांचं इतिहासावर असलेलं प्रेम आणि छावा सिनेमाच्या टीमची अपार मेहनत आहे यात शंका नाही. सिनेमातील मुख्य भूमिका साकारणारा विकी कौशल, महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत रश्मिका मंदाना आणि औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्ना तसेच सहकलाकार यांचा या यशात फार मोठा वाटा आहे. लक्ष्मण उटेकर यांच्या अत्यंत सुंदर अशा दिग्दर्शनाखाली पार पडलेल्या या सिनेमाची मॅडोक फिल्म्स तर्फे निर्मिती करण्यात आली आहे. शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या ‘छावा’ या कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमाला ए. आर. रहमान चे संगीत मिळाले असल्याने या सिनेमाला आणखीन चार चांद लागले आहेत.