Home लेटेस्ट न्यूज ऐन लग्नसराईत सोनं-चांदी महागलं!

ऐन लग्नसराईत सोनं-चांदी महागलं!

by sandy
0 comments

सोनं आणि चांदीच्या दरात नेहमीच उतार चढाव होत असतो. परंतु आता या लग्नसराईच्या काळात सोनं-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याची माहिती मिळाली आहे. मंगळवार, दि. ४ मार्च रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव तब्बल ४९७ रुपयांनी वाढला असल्याचे आढळते. आज सोन्याचा भाव हा ८५,९१७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. चांदी देखील ५७५ रुपयांनी वाढली असून आज तिची किंमत ९४,९७३ रुपये प्रति किलो ग्रॅम इतकी आहे. यावेळी नागरिकांचा खिशा सोनं-चांदी यासाठी मोठ्याप्रमाणात खाली होणार असल्याचं चित्र दिसत आहे. 
IBJA म्हणजेच इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनद्वारे घोषित करण्यात आलेल्या या दरात मोठ्या प्रमाणावर झालेली दरवाढ आढळून येत आहे.

 सोन्याचा भाव आजच्या दिवशी ८५,९१७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला असून त्यात ४९५ रुपयांची वाढ दिसत आहे. यावेळी २२ कॅरेट सोन्याचा सरासरी भाव ४५५ रुपयांनी वाढला असून ७८,६०८ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. तर १८ कॅरेटचा भाव ३७३ रुपयांनी वाढून ६४,३६३ रुपये प्रति १० ग्रॅम सांगण्यात येत आहे. यावेळी १४ कॅरेट सोन्याच्या दरात आता २९१ रुपयांनी वाढ झाली असून ४ कॅरेट सोने आता ५०,२०३ प्रति १० ग्रॅम या किंमतीने विकले जात आहे. 

सोने आणि चांदीच्या दरांवर जागतिक आणि स्थानिक घटकांच्या गुंतागुंतीच्या परस्परसंबंधाचा परिणाम होत असतो. जागतिक मागणी, चलन विनिमय दर, व्याजदर, सरकारी धोरण आणि जागतिक घडामोडी या सर्व उलाढाली तसेच घटकांवर सोनं-चांदीचा भाव ठरवण्यात येतो. या वर्षी सोन्याच्या दरात निरीक्षण केल्यास तब्बल १०,०७७ रुपयांनी वाढ झाली आहे आणि चांदी ८९५६ रुपयांनी महागली आहे. 

ऐन लग्नसराईत सर्वांच्या घरात सोनं-चांदी विकत घेण्याच्या गोष्टी सुरु आहेत आणि त्यात ही सोन्या चांदीची दरवाढ नागरिकांच्या आनंदात विरजण घालत आहे. यावेळी नागरिक चिंतेत आहेत. या सोन्या चांदीच्या भावात घसरण होईल की नाही याबाबत नागरिक साशंक असल्याचे दिसून येत आहेत.

आज सोन्याचे दर किती आहेत?

सोनं आणि चांदीच्या दरात नेहमीच उतार चढाव होत असतो. परंतु आता या लग्नसराईच्या काळात सोनं-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याची माहिती मिळाली आहे. मंगळवार, दि. ४ मार्च रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव तब्बल ४९७ रुपयांनी वाढला असल्याचे आढळते. आज सोन्याचा भाव हा ८५,९१७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. चांदी देखील ५७५ रुपयांनी वाढली असून आज तिची किंमत ९४,९७३ रुपये प्रति किलो ग्रॅम इतकी आहे. यावेळी नागरिकांचा खिशा सोनं-चांदी यासाठी मोठ्याप्रमाणात खाली होणार असल्याचं चित्र दिसत आहे.

१८ कॅरेट सोन्याचा दर किती आहे?

IBJA म्हणजेच इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनद्वारे घोषित करण्यात आलेल्या या दरात मोठ्या प्रमाणावर झालेली दरवाढ आढळून येत आहे. सोन्याचा भाव आजच्या दिवशी ८५,९१७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला असून त्यात ४९५ रुपयांची वाढ दिसत आहे. यावेळी २२ कॅरेट सोन्याचा सरासरी भाव ४५५ रुपयांनी वाढला असून ७८,६०८ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. तर १८ कॅरेटचा भाव ३७३ रुपयांनी वाढून ६४,३६३ रुपये प्रति १० ग्रॅम सांगण्यात येत आहे. यावेळी १४ कॅरेट सोन्याच्या दरात आता २९१ रुपयांनी वाढ झाली असून ४ कॅरेट सोने आता ५०,२०३ प्रति १० ग्रॅम या किंमतीने विकले जात आहे. 

You may also like

Leave a Comment

Search Here