Home लेटेस्ट न्यूज ‘एचएसआरपी’ नोंदणीद्वारे सायबर चोरांनी केली फसवणूक!

‘एचएसआरपी’ नोंदणीद्वारे सायबर चोरांनी केली फसवणूक!

by sandy
0 comments

सायबर फसवणूक दारांनी सध्या भयंकर चर्चेत असलेल्या एचएसआरपी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटला देखील सोडलं नाही. सध्या वाहनांसाठी एचएसआरपी नोंदणीसाठी सहा बनावटी लिंक तयार करुन वाहन मालकांची फसवणूक करण्यात येत आहे. एका सायबर फसवणुकदारा विरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सध्या २०१९ वर्षापूर्वीच्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) नोंदणी करणे अनिवार्य केले आहे, त्यामुळे प्रत्येक वाहन मालक ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी विविध मार्गांचा वापर करत आहेत. याचाच फायदा सध्या सायबर चोर घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. यावेळी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) नोंदणीसाठी सहा बनावट लिंक तयार करून वाहन मालकांची फसवणूक करणाऱ्या अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

वाहनांमधील सिक्युरिटी वाढवण्यासाठी, वाहनांमुळे होणारे गुन्हे टाळण्यासाठी, गाड्यांच्या नंबर प्लेट्समध्ये होणारा फेरफार आणि बनावट रोखण्यासाठी तसेच रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांची ओळख पटविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट
(एचएसआरपी) बसविण्याचे निर्देश दिले आहेत. वाहनांना एचएसआरपी बसविणे अनिवार्य आहे. ३० एप्रिलची अंतिम मुदत आदेशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना ३० एप्रिलपूर्वी एचएसआरपी बसविण्याचा निर्णय घेतला. यासाठी तीन संस्थांची नेमणूक केली आहे. प्लेट बसविण्याचे काम महाराष्ट्रात सुरू झाले आहे. एचएसआरपी बसविण्यासाठी वाहन मालकांना आरटीओच्या वेबसाइटवरील संबंधित टॅबमध्ये जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. 

 या कंपन्यांना काम मे. रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमिटेड (झोन-१), मे. रिअल मेझॉन इंडिया लिमिटेड (झोन-२) आणि मे. एफ.टी.ए. एवएसआरपी सोल्युशन्स लिमिटेड (झोन-३) यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापैकी झोन १ आणि २ कडून मिळालेल्या मेलमध्ये सायबर चोरांनी या कंपन्यांना काम मे. रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमिटेड (झोन-१), मे. रिअल मेझॉन इंडिया लिमिटेड (झोन-२) आणि मे. एफ.टी.ए. एवएसआरपी सोल्युशन्स लिमिटेड (झोन-३) यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापैकी झोन १ आणि २ कडून मिळालेल्या मेलमध्ये सायबर चोरांनी प्लेट बसविण्यासाठी सहा बनावट लिंक तयार करून त्या शेअर केल्याची माहिती मिळाली. भामटे वाहन मालकांची फसवणूक करीत असल्याचे लक्षात येताच परिवहन विभागाने बुधवारी पोलिसांत तक्रार दिली. बनावट संकेतस्थळांबद्दल पोलीसांकडे बऱ्याच तक्रारी येत होत्या. त्याबद्दल पोलिसांत एफआयआर दाखल केली आहे. सध्या अशी सहा संकेतस्थळे निदर्शनास आली असून त्याबाबत जागृतीसाठी माध्यमांमध्ये माहिती देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

एचएसआरपीच्या नावाखाली सायबर फसवणूक?

सायबर फसवणूक दारांनी सध्या भयंकर चर्चेत असलेल्या एचएसआरपी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटला देखील सोडलं नाही. सध्या वाहनांसाठी एचएसआरपी नोंदणीसाठी सहा बनावटी लिंक तयार करुन वाहन मालकांची फसवणूक करण्यात येत आहे. एका सायबर फसवणुकदारा विरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

एचएसआरपी फसवणूक रोखण्यासाठी काय उपाय करण्यात येत आहेत?

या कंपन्यांना काम मे. रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमिटेड (झोन-१), मे. रिअल मेझॉन इंडिया लिमिटेड (झोन-२) आणि मे. एफ.टी.ए. एवएसआरपी सोल्युशन्स लिमिटेड (झोन-३) यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापैकी झोन १ आणि २ कडून मिळालेल्या मेलमध्ये सायबर चोरांनी या कंपन्यांना काम मे. रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमिटेड (झोन-१), मे. रिअल मेझॉन इंडिया लिमिटेड (झोन-२) आणि मे. एफ.टी.ए. एवएसआरपी सोल्युशन्स लिमिटेड (झोन-३) यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापैकी झोन १ आणि २ कडून मिळालेल्या मेलमध्ये सायबर चोरांनी प्लेट बसविण्यासाठी सहा बनावट लिंक तयार करून त्या शेअर केल्याची माहिती मिळाली. भामटे वाहन मालकांची फसवणूक करीत असल्याचे लक्षात येताच परिवहन विभागाने बुधवारी पोलिसांत तक्रार दिली. बनावट संकेतस्थळांबद्दल पोलीसांकडे बऱ्याच तक्रारी येत होत्या. त्याबद्दल पोलिसांत एफआयआर दाखल केली आहे. सध्या अशी सहा संकेतस्थळे निदर्शनास आली असून त्याबाबत जागृतीसाठी माध्यमांमध्ये माहिती देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

You may also like

Leave a Comment

Search Here