82
बिहारमधील गया येथे असलेल्या महाबोधी विहाराच्या समर्थनार्थ दौंड शहरातून शांततेत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला आणि तरुणांनी सहभाग घेतला. आंदोलकांनी १९४९ चा कायदा रद्द करण्याची मागणी केली तसेच महाबोधी विहार बौद्धांच्या स्वाधीन करून त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली.
यासंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन दौंड तहसील कार्यालयात सादर करण्यात आले.