पुण्यात गुन्ह्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये घरफोडी होत आहे तसेच उपनगरांमध्ये जिथे कमी वस्ती आहे, अशा ठिकाणी चोरांनी बारीक लक्ष ठेवले आहे. कोथरुड, विश्रांतवाडी, चतुःशृंगी, शिवणे भागात घरफोडीच्या घटना समोर आल्या आहेत आणि या प्रकारात पोलिसांकडे गुन्हे नोंदवले जात आहेत.
पुण्यात बलात्कार, अन्नात भेसळ, मारामारी, छेड काढणे, सायबर फसवणूक असे अनेक गुन्हे याच महिन्यात ऐकायला मिळाले. आता घरफोडी, चोरी हे देखील होत असल्याचे उघडकीस आले आहे. विश्रांतवाडी परिसरात राहणाऱ्या तरुणाच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख ४० हजार रुपयांच्या वस्तूंची चोरी केली असल्याची बातमी समोर आली आहे. ही चोरी ६ मार्च ते ९ मार्च दरम्यान घडली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार करणाऱ्यांनी याविषयी सखोल माहिती दिली आहे.
चोरी होण्याच्या कालावधीत तक्रारदार घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरांनी दाराला लावलेले कुलू उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटात ठेवलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू, काही रक्कम चोरून नेली. गावाहून आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे चित्र दिसून आले आणि त्यांनी पोलीस ठाणे गाठलं. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शब्बीर शेख तपास करीत आहेत.
हाच प्रकार शिवणे परिसरात देखील घडला. शिवणे परिसरातील श्रिया या रेसिडन्सीमधील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ११ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ५ ते ९ मार्च कालावधीत कामठे वस्ती परिसरात घडली आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय तरुणाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरूण गावाला गेले असताना, चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील रोकड, सोन्या- चांदीचे दागिने असा १ लाख ११ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुरेवाड तपास करीत आहेत.
कोथरूड मध्ये राहत्या घरातील बेडरूममधील दिवाणामधून अज्ञात चोरट्याने ४ लाख ९२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दि. ६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान कोथरूड जवळील ऋतुरंग सोसायटीत ही घटना घडली. एका ५० वर्षीय महिलेने कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. वानवडी भागातील मॅरीड वसाहतीत बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून बेडरूमच्या कपाटातील ३ लाख ६४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. एका ३५ वर्षीय व्यक्तीने वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक चमन शेख पुढील तपास करीत आहेत. चतुःशृंगी भागातही सेनापती बापट रस्त्यावरील गोखलेनगर भागातील एका सोसायटीत राहत्या घरातून १ लक्ष ६८ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. एका ५२ वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
पुण्यात कुठे कुठे चोरी झाली?
पुण्यात गुन्ह्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये घरफोडी होत आहे तसेच उपनगरांमध्ये जिथे कमी वस्ती आहे, अशा ठिकाणी चोरांनी बारीक लक्ष ठेवले आहे. कोथरुड, विश्रांतवाडी, चतुःशृंगी, शिवणे भागात घरफोडीच्या घटना समोर आल्या आहेत आणि या प्रकारात पोलिसांकडे गुन्हे नोंदवले जात आहेत.
पुणे शहरात कशा प्रकारे चोरी होत आहे?