मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मेट्रो १ मार्गिकेवर आता वर्सोवा ते घाटकोपर या संपूर्ण मार्गाबरोबरच घाटकोपर ते अंधेरी या कमी अंतरासाठीही मेट्रो गाडी चालवण्याच्या हालचाली मुंबई मेट्रो १ प्रायव्हेट लिमिटेडतर्फे सुरु करण्यात येणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. या मार्गावर सध्याच्या क्षमतेपेक्षा दर तासाला ५ हजार अधिक प्रवासी प्रवास करू शकणार आहेत असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मेट्रो १ मार्गिकेची सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीने बांधा – वापरा – मालक व्हा आणि हस्तांतरित करा या तत्वावर उभारणी केली आहे. ही मेट्रो मार्गिका ११.४ किमी लांबीची असून त्यावर १२ स्थानक आहेत. सध्याच्या परिस्थितीत ही गाडी ४ डब्यांची आहे. या मेट्रो मार्गिकेवर कार्यालयीन दिवसात ५ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यातून कार्यालयीन वेळेत या मेट्रो मार्गिकेवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. भविष्यात प्रवासी संख्येत आणखी वाढ होईल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. या कारणास्तव गर्दीच्यावेळी अधिकाधिक प्रवाशांना हवे तिथे पोहोचवण्यासाठी अनुषंगाने उपाययोजना आखण्यात मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार घाटकोपर ते अंधेरी मार्गावर कमी अंतरासाठी मेट्रो गाडीच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. या मार्गिकेवर सध्याच्या परिस्थितीत ८८ टक्के प्रवासी हे केवळ घाटकोपर ते अंधेरीदरम्यानच प्रवास करतात. त्यातून कमी अंतराच्या मार्गावर अधिक फेऱ्या असाव्यात असे दिसते, आणि म्हणूनच याबाबतीत विचार सुरू आहे.
मेट्रो मार्गिकेमध्ये काय बदल करणार ते सविस्तर पाहूया… सध्या घाटकोपरमधून निघालेली मेट्रो ही शेवटच्या स्थानावर म्हणजेच वर्सोव्याला जाऊन थांबते. त्याऐवजी नव्या बदलात प्रवासी संख्या अधिक असल्याने घाटकोपर ते अंधेरी या मार्गावर काही अतिरिक्त गाड्या चालवल्या जाणार आहेत. या गद्य घाटकोपर स्थानकावरून सुटून अंधेरीपर्यंत जातील आणि तिथून पुन्हा घाटकोपर गाठतील. दोन गाड्यांपैकी एक गाडी अंधेरीपर्यंत जाईल आणि परतेल तर एक गाडी वर्सोव्यापर्यंत प्रवास करेल. गर्दीच्या वेळी लोकांचा त्रास वाचावा यासाठी दोन तासांकरता हा बदल करण्यात येणार आहे असे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे सांगण्यात आले आहे. यावेळी या गाड्यांची आठ टक्के क्षमता वाढणार असल्याची माहिती मिळाली आहे. हे बदल अस्तित्वात आल्यास दोन गाड्यांतील सध्याचे २२० सेकंदाचे असलेले अंतर हे २०५ वर येऊन ठेपणार आहे. यावेळी गाड्यांच्या फेऱ्या वाढून प्रवासी वाहतुकीची आठ टक्के क्षमता वाढणार असल्याचे निदर्शनात आले आहे.
मुंबई मेट्रोत कोणते बदल करण्यात आले आहेत?
मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मेट्रो १ मार्गिकेवर आता वर्सोवा ते घाटकोपर या संपूर्ण मार्गाबरोबरच घाटकोपर ते अंधेरी या कमी अंतरासाठीही मेट्रो गाडी चालवण्याच्या हालचाली मुंबई मेट्रो १ प्रायव्हेट लिमिटेडतर्फे सुरु करण्यात येणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. या मार्गावर सध्याच्या क्षमतेपेक्षा दर तासाला ५ हजार अधिक प्रवासी प्रवास करू शकणार आहेत असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मेट्रोचे बदल कोणत्या वेळी अवलंबणार आहेत?