मुबंईत रविवार, दि. ९ मार्च २०२५ रोजी अत्यंत धक्कादायक दुर्घटना घडल्याची बातमी उघडकीस आली आहे. मुंबईतील नागपाडा येथे रविवारी एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीतील पाण्याची टाकी साफ करण्यासाठी आत उतरलेल्या चार कामगारांचा गुदमरून जीव गेला असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईत सध्या अनेक इमारतींचे बांधकाम सुरु आहे. मुंबई विकसनशील क्षेत्र आहे. रोज काही ना काही बांधकाम सुरु असते. परंतु या बांधकामामध्ये अनेक कामगार आपला जीव देखील गमावत असतात. अनेकदा आपण बातम्या ऐकतो किंवा वाचतो तेव्हा आपल्याला हे लक्षात येते. असाच एक प्रसंग रविवारी, दि. ९ मार्च २०२५ रोजी मुंबईतील नागपाडा येथे घडला आहे. नागपाडा येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत पाण्याची टाकी साफ करण्यासाठी म्हणून चार कामगार टाकीमध्ये उतरले आणि त्यांचा श्वास गुदमरला. त्यांना टाकी साफ करताना कामगारांना अस्वस्थ वाटू लागलं असं समजून त्वरित अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले आणि लगेचच मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर त्वरित उपचारही सुरु झाले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
अग्निशमन अधिकाऱ्यांनी माहिती देत असताना सांगितले की, पाच कामगार पाण्याच्या टाकीत साफसफाई करण्यासाठी गेले होते, पण काम करत असताना ते बेशुद्ध पडले. बांधकामाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर लोकांनी अग्निशमन विभागाला कळवले आणि मग त्यांनी सर्वांना तातडीने शासकीय जेजे रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी यापैकी चार जणांना मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११ ते ११.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जेजे मार्ग पोलीस ठाण्यांतर्गत मस्तान तालाब जवळील दिमतीमकर रोडवरील बिस्मिल्ला स्पेस नावाच्या बांधकामाधीन इमारतीतील भूमिगत पाण्याच्या टाकीत हे सर्व उतरले होते. सुरुवातीला पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी नंतर या घटनेला दुजोरा देत चार मजुरांचा मृत्यू झाला असून पाचव्या मजुराची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले. या घटनेत मृत पावलेल्या मजुरांमध्ये १९ वर्षीय हसीपाल शेख, २० वर्षीय राजा शेख, ३६ वर्षीय झियाउल्ला शेख आणि ३८ वर्षीय इमांडू शेख यांचा समावेश आहे. तर, ३१ वर्ष वय असलेले पुरहान शेख यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळत आहे.
अशा घटना पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी यावेळी सेप्टिक टाक्या स्वच्छ करण्याचे नियम लक्षात घेणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मुंबई आणि आसपासच्या परिसरात गटारात पडून पाच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सेप्टिक टँक आणि सीवर लाइन्सच्या मॅन्युअल साफसफाईसाठी महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. अशा मर्यादित जागा स्वच्छ करण्यासाठी मशिनचा वापर करावा, असे महाराष्ट्राच्या नगरविकास विभागाने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले होते. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सेप्टिक टँक आणि सीवर लाईनमध्ये अगदी आवश्यक असेल तेव्हाच प्रवेश करावा. नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे नमूद केले आहे की, साफसफाई करणाऱ्या संस्थेला किंवा व्यक्तीने कोणत्याही कर्मचाऱ्याने प्रवेश करण्यापूर्वी मर्यादित जागेची खोली मोजली जाईल याची खात्री करावी. कोणतेही विषारी किंवा ज्वलनशील वायू तयार नसावेत याची खात्री करून घ्यावी. स्वच्छता कर्मचाऱ्यांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी व्यवस्था करावी, असेही राज्य सरकारने म्हटले होते.
पाण्याची टाकी साफ करताना कसा झाला मृत्यू?
मुंबईत सध्या अनेक इमारतींचे बांधकाम सुरु आहे. मुंबई विकसनशील क्षेत्र आहे. रोज काही ना काही बांधकाम सुरु असते. परंतु या बांधकामामध्ये अनेक कामगार आपला जीव देखील गमावत असतात. अनेकदा आपण बातम्या ऐकतो किंवा वाचतो तेव्हा आपल्याला हे लक्षात येते. असाच एक प्रसंग रविवारी, दि. ९ मार्च २०२५ रोजी मुंबईतील नागपाडा येथे घडला आहे. नागपाडा येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत पाण्याची टाकी साफ करण्यासाठी म्हणून चार कामगार टाकीमध्ये उतरले आणि त्यांचा श्वास गुदमरला. त्यांना टाकी साफ करताना कामगारांना अस्वस्थ वाटू लागलं असं समजून त्वरित अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले आणि लगेचच मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर त्वरित उपचारही सुरु झाले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाण्याची टाकी साफ करण्याचे नियम काय?
सेप्टिक टाक्या स्वच्छ करण्याचे नियम लक्षात घेणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मुंबई आणि आसपासच्या परिसरात गटारात पडून पाच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सेप्टिक टँक आणि सीवर लाइन्सच्या मॅन्युअल साफसफाईसाठी महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. अशा मर्यादित जागा स्वच्छ करण्यासाठी मशिनचा वापर करावा, असे महाराष्ट्राच्या नगरविकास विभागाने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले होते. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सेप्टिक टँक आणि सीवर लाईनमध्ये अगदी आवश्यक असेल तेव्हाच प्रवेश करावा. नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे नमूद केले आहे की, साफसफाई करणाऱ्या संस्थेला किंवा व्यक्तीने कोणत्याही कर्मचाऱ्याने प्रवेश करण्यापूर्वी मर्यादित जागेची खोली मोजली जाईल याची खात्री करावी. कोणतेही विषारी किंवा ज्वलनशील वायू तयार नसावेत याची खात्री करून घ्यावी. स्वच्छता कर्मचाऱ्यांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी व्यवस्था करावी, असेही राज्य सरकारने म्हटले होते.