Home लेटेस्ट न्यूज धक्कादायक! पुण्यात आंदोलनादरम्यात पोलिसांवर पेट्रोल फेकले!

धक्कादायक! पुण्यात आंदोलनादरम्यात पोलिसांवर पेट्रोल फेकले!

by sandy
0 comments

पुणेकरांनी पुन्हा एकदा हे म्हणण्याची वेळ आली की ‘पुण्यात नक्की चाललंय काय?’ पुण्यात आंदोलनावेळी पोलिसांवरच पेट्रोल टाकण्यात आले. पुण्यातील महापालिका मेट्रो स्थानकावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आंदोलन करतेवेळी मेट्रोची सेवा ठप्प केली तसेच आंदोलकांनी सरळ पोलीस अधिकाऱ्यांवर पेट्रोल टाकण्याचा विक्षिप्त प्रकार घडला असल्याचे सामोर आले आहे. 

या आंदोलनावेळी सुरक्षा करणाऱ्या पोलीस उपयुक्त संदीपसिंह आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या अंगावर आंदोलन करणाऱ्यांपैकी नरेंद्र पावटेकर आणि त्यांच्या सोबत असणाऱ्यांनी चक्क पेट्रोल फेकले. सुदैवाने काही मोठी घटना घडली नाही, परंतु परिस्थिती आधीच गंभीर होती त्यात आणखी अनर्थ नको यामुळे पोलिसांनी आंदोलकांना चांगलाच चोप दिला आणि त्यांना ताब्यात घेतले. 

आंदोलकांनी सर्वात आधी मेट्रोच्या मार्गिकेवर चढून आंदोलन करण्यास सुरुवात केली. यावेळी अनेक प्रोकार घोषणाबाजी देखील करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कसबा मतदारसंघातील कार्यकर्ते नरेंद्र पावटेकर दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या कार्यकर्त्यांसह महापालिका मेट्रो स्थानकावर आले. त्यांच्या हातात पेट्रोलच्या बाटल्या होत्या आणि विशेष म्हणजे काही महिला कार्यकर्त्या देखील त्यांच्यात सहभागी होत्या. कार्यकर्त्यांनी मेट्रोच्या मार्गिकेवर जाऊन मेट्रोसेवा ठप्प केली. यावेळी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना त्वरित कळवले आणि घटनास्थळी बोलावून घेतले. यावेळी पोलीस उपयुक्त संदीपसिंह गिल्ल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी आंदोलन आटोक्यात आणण्याचा आणि आंदोलन कर्त्यांशी संवाद साधण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु ही घटना त्यांच्या हाताशी येऊ शकली नाही. तब्बल तासभर पोलिसांनी हात जोडून आंदोलकांना विनंती करत आंदोलन टाळण्याचा आणि घडलेला प्रकार आटोक्यात आणण्याचा  बराच प्रयत्न केला. परंतु आंदोलन कर्ते काही ऐकायला आणि मागे हटायला तयार नव्हते.

पोलीस समजूत काढत असताना कार्यकर्त्यांनी थेट आपली भाषा शिवीगाळकडे वळवली. परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने गिल्ल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांना संपर्क करून परिस्थितीचे गांभीर्य कळवले. मात्र पावटेकर यांनी पक्षनेत्यांना शिवीगाळ करत त्यांच्याविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करूनही परिस्थिती गंभीर होती. चर्चेचा या आंदोलनावर कोणताच फरक पडत नव्हता. यामुळे पोलिसांनी आक्रमक पाऊल उचलले. कार्यकर्त्यांना मेट्रो मार्गिकेवरून हटवण्यासाठी पोलिसांनी पाऊल पुढे सरसावले. यावेळी हे लक्षात घेऊन आंदोलन कर्त्यांमधील नरेंद्र पावटेकर यांनी पोलीस उपयुक्त संदीपसिंह गिल्ल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या अंगावर पेट्रोल फेकले. यामुळे पोलीस अत्यंत गोंधळले.  

ही घटना तीव्र ऊन तसेच ओव्हरहेड मेट्रोसमोर घडली असता यावेळी पेट्रोलने पेट घेण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात होती, परंतु सुदैवाने पेट्रोलने पेट घेतला नाही आणि दोघेही बचावले. यावेळी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि स्वतः आंदोलकांना पकडून खाली खेचले. या आंदोलनाप्रकारणी कार्यकर्त्यांना पोलिसांनी चोप दिला आणि यातील १५ ते २० जणांना अटक देखील करण्यात आली आहे. यावेळी अटक केलेल्या १५ ते २० कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करत असताना अनेक पोलीस जखमी झाले. 

यावेळी नरेंद्र पावटेकर यांच्या या गंभीर वर्तणुकीमुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितले आहे. या गटाने आंदोलनकऱ्यांपासून स्वतःला वेगळे केले आहे. पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अधिकृत निवेदन जारी करून नरेंद्र पावटेकर यांची पक्षातून हकालपट्टी जाहीर केली आहे. “नरेंद्र पावटेकर हे तीन महिन्यांपूर्वी पक्षात प्रवेश केले होते. मात्र त्यांनी कोणत्याही पक्षीय कार्यक्रमात सहभाग घेतलेला नाही. आजचे आंदोलन पूर्णतः वैयक्तिक असून पक्षाचा त्याच्याशी 

कोणताही संबंध नाही. त्यांनी पुणेकरांची अडवणूक केली आणि पोलिसांवर हल्ला केला, त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे.” ते विधान पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप त्यांनी यावेळी केले. 

पुण्यात मेट्रोसेवा का ठप्प झालेली?

पुणेकरांनी पुन्हा एकदा हे म्हणण्याची वेळ आली की ‘पुण्यात नक्की चाललंय काय?’ पुण्यात आंदोलनावेळी पोलिसांवरच पेट्रोल टाकण्यात आले. पुण्यातील महापालिका मेट्रो स्थानकावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आंदोलन करतेवेळी मेट्रोची सेवा ठप्प केली तसेच आंदोलकांनी सरळ पोलीस अधिकाऱ्यांवर पेट्रोल टाकण्याचा विक्षिप्त प्रकार घडला असल्याचे सामोर आले आहे.

पोलिसांवर पेट्रोल फेकण्याचा प्रकार?

पोलीस समजूत काढत असताना कार्यकर्त्यांनी थेट आपली भाषा शिवीगाळकडे वळवली. परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने गिल्ल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांना संपर्क करून परिस्थितीचे गांभीर्य कळवले. मात्र पावटेकर यांनी पक्षनेत्यांना शिवीगाळ करत त्यांच्याविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करूनही परिस्थिती गंभीर होती. चर्चेचा या आंदोलनावर कोणताच फरक पडत नव्हता. यामुळे पोलिसांनी आक्रमक पाऊल उचलले. कार्यकर्त्यांना मेट्रो मार्गिकेवरून हटवण्यासाठी पोलिसांनी पाऊल पुढे सरसावले. यावेळी हे लक्षात घेऊन आंदोलन कर्त्यांमधील नरेंद्र पावटेकर यांनी पोलीस उपयुक्त संदीपसिंह गिल्ल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या अंगावर पेट्रोल फेकले. यामुळे पोलीस अत्यंत गोंधळले.

कार्यकर्ता नरेंद्र पावटेकर यांच्यावर कारवाई होणार का?

नरेंद्र पावटेकर यांच्या या गंभीर वर्तणुकीमुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितले आहे. या गटाने आंदोलनकऱ्यांपासून स्वतःला वेगळे केले आहे. पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अधिकृत निवेदन जारी करून नरेंद्र पावटेकर यांची पक्षातून हकालपट्टी जाहीर केली आहे. “नरेंद्र पावटेकर हे तीन महिन्यांपूर्वी पक्षात प्रवेश केले होते. मात्र त्यांनी कोणत्याही पक्षीय कार्यक्रमात सहभाग घेतलेला नाही. आजचे आंदोलन पूर्णतः वैयक्तिक असून पक्षाचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. त्यांनी पुणेकरांची अडवणूक केली आणि पोलिसांवर हल्ला केला, त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे.” ते विधान पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप त्यांनी यावेळी केले. 

You may also like

Leave a Comment

Search Here