Home लेटेस्ट न्यूज पुण्यातील वाढत्या प्रदूषणावर नागरिकांचा मूकमोर्चा!

पुण्यातील वाढत्या प्रदूषणावर नागरिकांचा मूकमोर्चा!

by sandy
0 comments

गेल्या आठवड्यात म्हणजेच शनिवार, दि. ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनाच्या दिवशी पुण्यातील पिंपरी येथे नागरिकांनी वाढत्या प्रदूषणाच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वळवण्यासाठी वाकड, ताथवडे आणि मारुंजी परिसरातील नागरिकांनी मूकमोर्चा काढला. तेवीसपेक्षा जास्त गृहनिर्माण सोसायट्यांमधील पाचशेहून अधिक रहिवासी या हवा प्रदूषण विरोधी मूक मोर्चेत सहभागी झाले होते. यावेळी वाढत्या प्रदूषणाविरुद्ध नागरिकांनी तोंडाला काळे मास्क आणि हाताला लाल रिबन बांधून निषेध व्यक्त केला. 

पुण्यासह संपूर्ण राज्यात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र पुणेकरांनी याची दखल घेतली आणि याबाबत सरकारला जागृत करण्यासाठी शनिवार, ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त मूकमोर्चा काढला. वाकड – ताथवडे हाऊसिंग ससोसायटी फोरम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा कोहिनुर कोर्टयार्ड वन सोसायटीपासून इंदिरा स्कुल येथून वाकडकर चौकापर्यंत नेण्यात आला. या मोर्चेमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी मूक मोर्चेद्वारे पर्यावरण, प्रदूषण, नागरिकांना भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष वेधले. सिमेंट मिक्स धूळ आणि रस्त्यावरील अवजड वाहनांमुळे होणारे प्रदूषण यामुळे परिसरातील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून श्वसनाचे अनेक आजार वाढत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. यावेळी नागरिकांच्या हातात विविध फलक देखील होते ज्यावर अनेक घोषणात्मक वाक्य लिहिली होती. ‘धुळीने भरली आमची छाती’, ‘पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पीएमआरडीए हवेतील प्रदूषण कमी कर’, ‘प्रशासन झोपले आहे, नागरिक त्रासले आहेत’, ‘नको धूळ, शुद्ध हवा आमचा अधिकार’, ‘दुर्लक्ष करी सरकारी खाती, धुळीने भरली आमची छाती’, ‘आमच्या जीवाशी खेळू नका, आम्ही कर भरतो, धूळ खाण्यासाठी नाही’ असे अनेक फलक हातात धरून नागरिक मोर्चेमध्ये सहभागी झाले होते. 

यावेळी नागरिकांनी प्रदूषणाबाबत अनेक मागण्या केल्या. सिमेंट मिक्स धूळ त्वरित बंद व्हावी, वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक नियम आणि उपाययोजना लागू कराव्यात, वायू प्रदूषण पातळीची नियमित तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा, रस्त्यांची नियमित दोन वेळा साफसफाई करून धुळीचे प्रमाण कमी करावे. नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात यावी, रस्त्यावरील धूळ कमी व्हावी यासाठी टँकरद्वारे फवारा मारला जावा, प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होऊ नये याची योग्य काळजी घ्यावी. अशा अनेक महत्वपूर्ण मागण्या या मोर्च्यात सामील झालेल्या नागरिकांद्वारे करण्यात आल्या आहेत. 

पुण्यात वाढणाऱ्या प्रदूषणाचे काय?

गेल्या आठवड्यात म्हणजेच शनिवार, दि. ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनाच्या दिवशी पुण्यातील पिंपरी येथे नागरिकांनी वाढत्या प्रदूषणाच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वळवण्यासाठी वाकड, ताथवडे आणि मारुंजी परिसरातील नागरिकांनी मूकमोर्चा काढला. तेवीसपेक्षा जास्त गृहनिर्माण सोसायट्यांमधील पाचशेहून अधिक रहिवासी या हवा प्रदूषण विरोधी मूक मोर्चेत सहभागी झाले होते. यावेळी वाढत्या प्रदूषणाविरुद्ध नागरिकांनी तोंडाला काळे मास्क आणि हाताला लाल रिबन बांधून निषेध व्यक्त केला. 

या मोर्च्यात नागरिकांच्या काय मागण्या होत्या?

नागरिकांनी प्रदूषणाबाबत अनेक मागण्या केल्या. सिमेंट मिक्स धूळ त्वरित बंद व्हावी, वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक नियम आणि उपाययोजना लागू कराव्यात, वायू प्रदूषण पातळीची नियमित तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा, रस्त्यांची नियमित दोन वेळा साफसफाई करून धुळीचे प्रमाण कमी करावे. नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात यावी, रस्त्यावरील धूळ कमी व्हावी यासाठी टँकरद्वारे फवारा मारला जावा, प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होऊ नये याची योग्य काळजी घ्यावी. अशा अनेक महत्वपूर्ण मागण्या या मोर्च्यात सामील झालेल्या नागरिकांद्वारे करण्यात आल्या आहेत.

You may also like

Leave a Comment

Search Here