रस्त्यावर मोठमोठ्या होर्डिंग्स आणि त्याबाबत घडणाऱ्या दुर्घटना थांबवण्यासाठी महापालिकेतर्फे एक निर्णय घेण्यात आला आहे. नुकत्याच घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यसभेतील १ लाख ९ हजार ३८७ अनधिकृत हर्डिंग्स काढण्यात आल्या आहेत. त्यासोबतच महापालिका आणि नगरपालिकांच्या क्षेत्रातील होर्डिंग्सचे ऑडिट दरवर्षी करण्यात येणार आहे अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली आहे.
मोठमोठाल्या या होर्डिंगमुळे राज्यभरात धोक्याचे वातावरण नेहमीच पसरले असते. अनेकदा या होर्डिंगमुळे दुर्घटना घडत असतात, तसेच अनेक जण आपला जीव गमावतात तर अनेक जखमी होतात. अशा घटना अनेकदा कानावर आल्या आहेत. घाटकोपर येथे घडलेल्या होर्डिंगच्या दुर्घटने प्रकरणी पालिकेने दखल घेतली आहे. भाजपचे योगेश सागर यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला. विजय वडेट्टीवार, अमित साटम, जितेंद्र आव्हाड, सुभाष देशमुख, चेतन तुपे, वरुण सरदेसाई यांनी देखील उपप्रश्न केले. मुंबईत फुटपाथवर होर्डिंग कसे लागले आहेत हे सांगताना सरदेसाई यांनी फोटोच दाखविले. सरकार नवे धोरण आणणार इमारतीच्या बाहेरही जाहिराती लावल्या जात आहेत, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. अनधिकृत होर्डिंगची चौकशी करून कारवाईदेखील केली जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर सर्व महापालिका आणि नगरपालिकांच्या शहरांमध्ये होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. आता सरकार होर्डिंगबाबतचे नवे धोरण आणणार असल्याची माहिती मिळाली आहे. ५९ प्रकरणात गुन्हे दाखल राज्यात एकूण ९ हजार २६ ठिकाणी होर्डिंग्जचे ऑडिट करण्यात आले आहे. राज्यात १ लाख ९ हजार ३८७ होर्डिंग्ज काढून टाकण्यात आले आहेत. या प्रकरणी ज्यांनी सहकार्य केले नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे एकूण ५९ गुन्हे दाखल झाले आहेत. महापालिका क्षेत्रात ४८ गुन्हे, तर नगरपालिका क्षेत्रात ११ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
घाटकोपरसारख्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी अधिकृत आणि अनधिकृत सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट सर्व महापालिका आणि नगरपालिकांकडून करण्यात येणार येईल. दाट लोकवस्त्यांमध्ये होर्डिंग लावू नयेत असे आदेश असूनही या आदेशाचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे सदस्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर सामंत यांनी या प्रकरणी कारवाईचे आश्वासन दिले.
होर्डिंगवर कारवाई कशी करण्यात आली आहे?
घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर सर्व महापालिका आणि नगरपालिकांच्या शहरांमध्ये होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. आता सरकार होर्डिंगबाबतचे नवे धोरण आणणार असल्याची माहिती मिळाली आहे. ५९ प्रकरणात गुन्हे दाखल राज्यात एकूण ९ हजार २६ ठिकाणी होर्डिंग्जचे ऑडिट करण्यात आले आहे. राज्यात १ लाख ९ हजार ३८७ होर्डिंग्ज काढून टाकण्यात आले आहेत. या प्रकरणी ज्यांनी सहकार्य केले नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे एकूण ५९ गुन्हे दाखल झाले आहेत. महापालिका क्षेत्रात ४८ गुन्हे, तर नगरपालिका क्षेत्रात ११ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
होर्डिंगबाबत कुणी तक्रार केली?