Home लेटेस्ट न्यूज राणीच्या बागेत मिनी बस?

राणीच्या बागेत मिनी बस?

by sandy
0 comments

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले नवस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय म्हणजेच मुंबईच्या भाषेत राणीची बाग आणखीन आकर्षक करण्यासाठी आणि येथे येणाऱ्या लहान मुलांसाठी मिनी बस आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

भायखळा येथील राणीच्या बागेचा झपाट्याने कायापालट होत आहे. या राणीच्या बागेकडे पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. वन्य अधिवासाची अनुभूती देणारे प्राण्यांसाठी नव्याने उभारण्यात आलेले पिंजरे, प्राण्यांची वाढती संख्या, उत्तम व्यवस्थापन यामुळे अनेक पर्यटकांची पाऊले राणीच्या बागेला भेट देण्यासाठी वळत आहे. आता येथे सुरु होणारी मिनी बस आणखीन एक आकर्षक बाब ठरणार. ही मिनी बस लहान मुलांसाठी असणार आहे. 

या राणीच्या बागेत पेंगवीन आल्यापासून लहान मुलांपासून सर्वच वयोगटाचे पर्यटक राणीच्या बागेत एकच गर्दी करत आहेत. त्यामुळे पालिकेला राणीच्या बागेमुळे अतिरिक्त महसूल मिळत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. राणीच्या बागेत सर्पालय उभारण्याच्या अर्जाबाबत प्राणिसंग्रहालय प्राधिकारणातर्फे सर्पालयासाठी मंजुरी मिळाली आहे. येत्या काही महिन्यात सर्पालयाचा उभारणीस सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे, तसेच हे बांधकाम २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे सर्पालय १६ हजार ८०० चौरस फूट जागेत बांधण्यात येणार आहे. यामध्ये विविध प्रजातींचे सर्प मोठ्या प्रमाणात ठेवण्यात येणार आहेत. सध्या मात्र राणीच्या बागेत पेंग्विन, वाघ, अस्वल, हरीण, अजगर, तरस, अनेक पक्षी, हत्ती, माकडे असे अनेक प्राणी पाहावयास मिळतात.

राणीच्या बागेत मिनी बस येणार?

न्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले नवस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय म्हणजेच मुंबईच्या भाषेत राणीची बाग आणखीन आकर्षक करण्यासाठी आणि येथे येणाऱ्या लहान मुलांसाठी मिनी बस आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. भायखळा येथील राणीच्या बागेचा झपाट्याने कायापालट होत आहे. या राणीच्या बागेकडे पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. वन्य अधिवासाची अनुभूती देणारे प्राण्यांसाठी नव्याने उभारण्यात आलेले पिंजरे, प्राण्यांची वाढती संख्या, उत्तम व्यवस्थापन यामुळे अनेक पर्यटकांची पाऊले राणीच्या बागेला भेट देण्यासाठी वळत आहे. आता येथे सुरु होणारी मिनी बस आणखीन एक आकर्षक बाब ठरणार. ही मिनी बस लहान मुलांसाठी असणार आहे.

राणीच्या बागेत किती प्राणी आहेत?

या राणीच्या बागेत पेंगवीन आल्यापासून लहान मुलांपासून सर्वच वयोगटाचे पर्यटक राणीच्या बागेत एकच गर्दी करत आहेत. त्यामुळे पालिकेला राणीच्या बागेमुळे अतिरिक्त महसूल मिळत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. राणीच्या बागेत सर्पालय उभारण्याच्या अर्जाबाबत प्राणिसंग्रहालय प्राधिकारणातर्फे सर्पालयासाठी मंजुरी मिळाली आहे. येत्या काही महिन्यात सर्पालयाचा उभारणीस सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे, तसेच हे बांधकाम २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे सर्पालय १६ हजार ८०० चौरस फूट जागेत बांधण्यात येणार आहे. यामध्ये विविध प्रजातींचे सर्प मोठ्या प्रमाणात ठेवण्यात येणार आहेत. सध्या मात्र राणीच्या बागेत पेंग्विन, वाघ, अस्वल, हरीण, अजगर, तरस, अनेक पक्षी, हत्ती, माकडे असे अनेक प्राणी पाहावयास मिळतात.

You may also like

Leave a Comment

Search Here