Home लेटेस्ट न्यूज पोलिसांनी उचलले योग्य पाऊल… गाड्यांची विनाकारण तोडफोड करणाऱ्यांना दिली जागीच शिक्षा!

पोलिसांनी उचलले योग्य पाऊल… गाड्यांची विनाकारण तोडफोड करणाऱ्यांना दिली जागीच शिक्षा!

by sandy
0 comments

पोलिसांनी

पुण्यात अनेक दिवसांपासून विनाकारण गाड्यांची तोडफोड करण्यात येत आहे. परंतु पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात मात्र गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींना जागीच शिक्षा देण्यात आली असल्याची बातमी मिळाली आहे. आरोपींची वरात काढत पोलिसांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. जिथे गाड्या फोडण्यात आल्या तिथेच त्या तोडफोड करणाऱ्यांना गुडघ्यावर चालायला लावून त्या आरोपींची पोलिसांतर्फे धिंड काढण्यात आली आहे. 

पुण्यात विनाकारण गाड्यांची तोडफोड होणाऱ्या घटना समोर येत आहेत. बहुतेक यामागे नागरिकांमध्ये दहशत माजवणे हा उद्देश असू शकेल. पुण्यातील भारती विद्यापीठ येथे मात्र गाडी फोडताना या आरोपींना पोलिसांकडून पकडण्यात आले आणि त्यांना जागीच शिक्षा देण्यात आली आहे. दहशत माजवण्यासाठी मंगलमूर्ती सहकारी गृह रचना मर्यादित सोसायटीत २ जणांनी गाड्यांची तोडफोड केली होती. संबंधित प्रकाराची तक्रार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनल दाखल करण्यात आली होती. तक्रारीची तातडीने दखल घेत पोलिसांनी २ दिवसात आरोपींना अटक केली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कात्रज गुजरवाडी रोड येथील भारत नगर येथे लाईट नसल्याचा फायदा घेत अज्ञातांनी तब्बल १० वाहनांची तोडफोड केली होती. त्यांना धडा शिकवत पोलिसांनी त्याच भागात धिंड काढली.

दहशत माजवण्यासाठी पुणे शहरातील उपनगरात गाड्या तोडफोडीचे प्रमाण वाढू लागले आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खून, मारामाऱ्या, चोरी, स्त्रियांवरील अत्याचार यांचे प्रमाण वाढत असतानाच विनाकारक गाड्यांची तोडफोड वाढू लागली आहे. पोलिसांकडून आरोपींना धडा शिकवण्यासाठी रस्त्यांवरून धिंड काढली जात आहे. या दहशत माजविणाऱ्या आरोपींमध्ये पोलिसांचा देखील धाक राहिलेला नाही. त्यामुळे या घटना वारंवार होत असल्याचे कानावर येत आहे. आता या गुन्हेगारीला आळा घालण्याचे मोठे आव्हानच पोलिसांसमोर उभे राहिले आहे. परंतु आता जो पोलिसांनी या आरोपींना चोप दिला असल्याने या गाड्यांची तोडफोड होण्यात घट होण्याची शक्यता वर्तवता येते.

पुण्यात गाड्यांची तोडफोड का होत आहे?

पुण्यात अनेक दिवसांपासून विनाकारण गाड्यांची तोडफोड करण्यात येत आहे. परंतु पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात मात्र गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींना जागीच शिक्षा देण्यात आली असल्याची बातमी मिळाली आहे. आरोपींची वरात काढत पोलिसांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. जिथे गाड्या फोडण्यात आल्या तिथेच त्या तोडफोड करणाऱ्यांना गुडघ्यावर चालायला लावून त्या आरोपींची पोलिसांतर्फे धिंड काढण्यात आली आहे.

पोलिसांनी गाडी तोडफोड प्रकरणी काय केले?

दहशत माजवण्यासाठी पुणे शहरातील उपनगरात गाड्या तोडफोडीचे प्रमाण वाढू लागले आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खून, मारामाऱ्या, चोरी, स्त्रियांवरील अत्याचार यांचे प्रमाण वाढत असतानाच विनाकारक गाड्यांची तोडफोड वाढू लागली आहे. पोलिसांकडून आरोपींना धडा शिकवण्यासाठी रस्त्यांवरून धिंड काढली जात आहे. या दहशत माजविणाऱ्या आरोपींमध्ये पोलिसांचा देखील धाक राहिलेला नाही. त्यामुळे या घटना वारंवार होत असल्याचे कानावर येत आहे. आता या गुन्हेगारीला आळा घालण्याचे मोठे आव्हानच पोलिसांसमोर उभे राहिले आहे. परंतु आता जो पोलिसांनी या आरोपींना चोप दिला असल्याने या गाड्यांची तोडफोड होण्यात घट होण्याची शक्यता वर्तवता येते.

You may also like

Leave a Comment

Search Here