Home लेटेस्ट न्यूज पुणेकरांनो काळजी घ्या… पुणे शहरातील १३८ पाणी नमुने पिण्यास अयोग्य!

पुणेकरांनो काळजी घ्या… पुणे शहरातील १३८ पाणी नमुने पिण्यास अयोग्य!

by sandy
0 comments

पुण्यात जीबीएस म्हणजेच गुइलेन बॅरे सिंड्रोम या रोगाचे रुग्ण वाढतच आहेत आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेने पुण्यातील सर्वच भागांतील पाणी पिण्यास किती प्रमाणात सुरक्षित आणि योग्य आहे हे तपासणे सुरु केले आहे. यामध्ये सिंहगड परिसरातील पाण्याचे नमुने सातत्याने तपासले जात आहेत. आतापर्यंत ७ हजार १९५ नमुने तपासले गेले आहेत आणि त्यातले १३८ पाण्याचे नमुने हे पिण्यास अयोग्य ठरले आहेत. पुणेकरांनी या तसेच दूषित पाण्यामुळे होणाऱ्या अन्य रोगांपासून स्वतःची काळजी घेणे गरजेचे ठरत आहे. 

पुणे जिल्ह्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम या रोगामुळे अनेक रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम देखील अत्यंत भीषण आहेत. यामुळे पुणेकरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पुणे महानगर पालिकेने अत्यंत महत्वाचे पाऊल उचलले आहे. पुणे महानगर पालिकेतर्फे पुणे जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे पाणी तपासण्याची मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील पाण्याचे ७ हजार १९५ नमुने तपासले जात आहेत आणि या नमुन्यातील तब्बल १३८ पाण्याचे यामुळे पिण्यास अयोग्य ठरले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची सूचना करण्यात आली आहे. परंतु तरी देखील नागरिकांनी सावध राहणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी पिण्यापूर्वी उकळून घेण्याची तसदी पुणेकरांनी घेणे आवश्यक आहे. हेच आवाहन नागरिकांना आरोग्य विभागातर्फे देखील करण्यात आहे आहे. 

पुणे जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून ‘जीबीएस’ म्हणजेच गुइलेन बॅरे सिंड्रोम या दुर्मीळ आजाराचा उद्रेक झाला आहे. या आजाराचे निदान पाणी असल्याची शंका मध्यंतरी निर्माण झाली होती. यामुळे शहरातील विविध भागांतील पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत शोधण्यात येत आहे. यात खडकवासला धरण, खासगी विहिरी आणि खासगी रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्रकल्पांसह टँकरच्या पाण्याचा समावेश आहे. हा स्त्रोत शोधून पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. हे नमुने महापालिकेचे पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आणि राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. आतापर्यंत ७ हजार १९५ पाणी नमुने तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. यामधील १३८ पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य आढळले असल्याची माहिती मिळत आहे.

जीबीएस या आजाराचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळत आहेत. आतापर्यंत २२४ ‘जीबीएस’चे रुग्ण पुण्यात सापडले आहेत. त्यातील १९५ रुग्णांवर निदान झाले आहे. तर राज्यभरात १७८ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. ‘जीबीएस’मुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून, सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरात आढळले आहेत. या रुग्णांमध्ये ४६ रुग्ण पुणे महापालिका, ९५ रुग्ण महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावात, ३३ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत तर ३६ रुग्ण पुणे ग्रामीण भागात आढळले आहेत. एकूण रुग्णांपैकी २६ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दूषित पाण्यात ई-कोलाय आणि कॉलिफॉर्म हे जिवाणू आढळून येत आहेत. ज्या भागात पाणी दूषित आढळले, त्या भागात शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची सूचना पाणीपुरवठा विभागाला देण्यात येत आहेत अशी माहिती महापालिकेतर्फे मिळाली आहे.

पुण्यातील पाणी किती दूषित आहे?

पुण्यात जीबीएस म्हणजेच गुइलेन बॅरे सिंड्रोम या रोगाचे रुग्ण वाढतच आहेत आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेने पुण्यातील सर्वच भागांतील पाणी पिण्यास किती प्रमाणात सुरक्षित आणि योग्य आहे हे तपासणे सुरु केले आहे. यामध्ये सिंहगड परिसरातील पाण्याचे नमुने सातत्याने तपासले जात आहेत. आतापर्यंत ७ हजार १९५ नमुने तपासले गेले आहेत आणि त्यातले १३८ पाण्याचे नमुने हे पिण्यास अयोग्य ठरले आहेत. पुणेकरांनी या तसेच दूषित पाण्यामुळे होणाऱ्या अन्य रोगांपासून स्वतःची काळजी घेणे गरजेचे ठरत आहे.

पुण्यात जीबीएसचे किती रुग्ण आढळत आहेत?

जीबीएस या आजाराचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळत आहेत. आतापर्यंत २२४ ‘जीबीएस’चे रुग्ण पुण्यात सापडले आहेत. त्यातील १९५ रुग्णांवर निदान झाले आहे. तर राज्यभरात १७८ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. ‘जीबीएस’मुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून, सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरात आढळले आहेत. या रुग्णांमध्ये ४६ रुग्ण पुणे महापालिका, ९५ रुग्ण महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावात, ३३ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत तर ३६ रुग्ण पुणे ग्रामीण भागात आढळले आहेत. एकूण रुग्णांपैकी २६ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दूषित पाण्यात ई-कोलाय आणि कॉलिफॉर्म हे जिवाणू आढळून येत आहेत. ज्या भागात पाणी दूषित आढळले, त्या भागात शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची सूचना पाणीपुरवठा विभागाला देण्यात येत आहेत अशी माहिती महापालिकेतर्फे मिळाली आहे. 

You may also like

Leave a Comment

Search Here