Home लेटेस्ट न्यूज पुण्यात BMW कार मालकाचे मद्यधुंद अवस्थेत अश्लील चाळे!  

पुण्यात BMW कार मालकाचे मद्यधुंद अवस्थेत अश्लील चाळे!  

by sandy
0 comments

पुण्यात

पुण्यात भर रस्त्यावर अश्लील चाळे करत असलेल्या एका तरुणाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. आज सकाळी पुण्यात एका मद्यधुंद अवस्थेत असलेला हा तरुण BMW गाडीतून उतरून रस्त्यावर अश्लील चाळे करत असताना दिसत आहे. आजच्या पिढीसाठी ही अत्यंत लांच्छनास्पद घटना आहे. 

पुण्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. रोज एक नवी बातमी समोर येऊन उभी राहत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पुण्यात रोज घडणाऱ्या भीषण घटना पाहिल्यानंतर पेशव्यांनी जपलेल्या या पुण्यात नक्की चाललंय तरी काय ? असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो आहे. मागच्याच आठवड्यात पुण्यात स्वारगेट एसटी डेपो परिसरात एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला. त्याच्या दोन दिवसानंतर पुण्यातील एका गावात पीडितेच्या मामाच्या मुलासमोर तिचा बलात्कार करण्यात आला. त्यानंतर पुण्यात टॅक्सीने प्रवास करणाऱ्या एका महिलेला असाच अनुभव आला. तिने सिग्नलला टॅक्सी थांबल्यानंतर पळत जाऊन पोलीस ठाणे गाठलं. आता पुण्यात सकाळच्या वेळेला BMW कारमधील मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने रस्त्यावर अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील विकृती शिगेला पोहोचत असल्याचं चित्र दिसून येत आहे. 

दारू पिऊन अत्यंत मद्यधुंद अवस्थेत हा तरुण गाडी चालवत होता. येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात जगातील महिला दिनाच्या दिवशी स्त्रियांच्या समोर त्याने अत्यंत अश्लील असे चाळे केले. हा तरुण आणि त्याच्यासोबत गाडीत बसलेला एक त्याचा मित्र दोघेही दारू पिऊन अखंड नशेत होते. अश्लील चाळे करुन झाल्यावर दोघे फुल स्पीडमध्ये गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने गेले. सकाळच्या सुमारास तरुणाने एका सिग्नलवर ही अश्लील हरकत केली. पुणे नगर रोडवरील शास्त्रीनगर चौकात ही घटना घडली. हा मद्यधुंद असलेला तरुण आणि त्याचा मित्र BMW कार मध्ये बसलेले होते. या कारचा नंबर MH- 12 RF8419 आहे.

पुण्यातील महिलांनी तसेच तरुण मंडळींनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. लहान मुलांपुढे म्हणजेच उगवत्या पिढीसमोर आपण काय आदर्श ठेवत आहोत याचं भान प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. आपण देशाचे एक जबाबदार नागरिक आहोत, त्या जबाबदारीसह आपला या देशात वावर असायला हवा. आपल्यामुळे अन्य तरुण तसेच पिढी यांच्या संस्कारांवर परिणाम होऊ नये याबाबत सर्वांनी दक्ष राहावं, तसेच कुठलेही गैरवर्तन करण्यापूर्वी त्यानंतरच्या परिणामांचा विचार करावा. 

पुण्यात तरुणाने केले अश्लील चाळे:

पुण्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. रोज एक नवी बातमी समोर येऊन उभी राहत आहे. 
त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पुण्यात रोज घडणाऱ्या भीषण घटना पाहिल्यानंतर पेशव्यांनी जपलेल्या या पुण्यात नक्की चाललंय तरी काय ? असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो आहे. मागच्याच आठवड्यात पुण्यात स्वारगेट एसटी डेपो परिसरात एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला. त्याच्या दोन दिवसानंतर पुण्यातील एका गावात पीडितेच्या मामाच्या मुलासमोर तिचा बलात्कार करण्यात आला. त्यानंतर पुण्यात टॅक्सीने प्रवास करणाऱ्या एका महिलेला असाच अनुभव आला. तिने सिग्नलला टॅक्सी थांबल्यानंतर पळत जाऊन पोलीस ठाणे गाठलं. आता पुण्यात सकाळच्या वेळेला BMW कारमधील मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने रस्त्यावर अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील विकृती शिगेला पोहोचत असल्याचं चित्र दिसून येत आहे.

अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाच्या गाडीचा नंबर काय होता?

दारू पिऊन अत्यंत मद्यधुंद अवस्थेत हा तरुण गाडी चालवत होता. येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात जगातील महिला दिनाच्या दिवशी स्त्रियांच्या समोर त्याने अत्यंत अश्लील असे चाळे केले. हा तरुण आणि त्याच्यासोबत गाडीत बसलेला एक त्याचा मित्र दोघेही दारू पिऊन अखंड नशेत होते. अश्लील चाळे करुन झाल्यावर दोघे फुल स्पीडमध्ये गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने गेले. सकाळच्या सुमारास तरुणाने एका सिग्नलवर ही अश्लील हरकत केली. पुणे नगर रोडवरील शास्त्रीनगर चौकात ही घटना घडली. हा मद्यधुंद असलेला तरुण आणि त्याचा मित्र BMW कार मध्ये बसलेले होते. या कारचा नंबर MH- 12 RF8419 आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here