मुंबईकरांसाठी आनंदाची आणि दिलासा दायक बातमी समोर आली आहे. मुंबईत निर्माण होणारी रोजची समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. ही समस्या अति वाहनांचा वापर केल्याने होत असते. या वाहतूक कोंडीपासून काही प्रमाणात सुटका मिळवण्यासाठी परिवहन खात्याकडून एक मार्ग काढण्यात आला आहे. राज्याच्या परिवहन खात्याकडून मुंबईत बाईक टॅक्सी सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येत आहेत. पुढील काही दिवसात या निर्णयाला मंजुरी देण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
वाहतूक कोंडी, टॅक्सीसाठी द्यावे लागणारे जास्तीचे पैसे यातून लवकरच मुंबईकरांची सुटका होणार आहे. राज्याच्या परिवहन खात्याकडून मुंबईत बाईकटॅक्सी सुरू करण्यासंदर्भात वेगाने प्रक्रिया सुरू आहे. विधानभवन परिसरामध्ये पत्रकारांशी कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना मुंबईत बाईक टॅक्सी चालवण्याच्या निर्णयाबद्दल विचारण्यात आले. यावेळी सरनाईक यांनी सविस्तर माहिती दिली.
महायुती सरकारच्या काळात तरुण-तरुणींना रोजगार मिळावा आणि प्रवाशांच्या प्रवासावरील खर्च कमी व्हावा यासाठी देशातील २२ राज्यांमध्ये बाईक टॅक्सी चालू आहेत. राज्य सरकारनेही तो निर्णय घेण्याचे ठरवले आहे आणि या संदर्भात अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे”, असे स्पष्टीकरण प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिले.
या महिन्यातच बाईक टॅक्सीला मंजुरी मिळण्याची शक्यता प्रताप सरनाईक यांनी वर्तवली आहे. कारण यासंदर्भात काही सुरक्षिततेचे नियम जे आहेत, ते बाईक टॅक्सी चालवताना प्रवाशांसंदर्भात घेणं, गरजेचं आहे. गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे बाईक टॅक्सी चालवताना तरुण वा तरुणीसोबत कोणताही गुन्हा घडणार नाही, यासाठी काही निर्णय परिवहन खात्याच्या माध्यमातून घ्यायचे आहेत, असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
या राज्यातील १० ते २० हजार तरुण-तरुणींना रोजगार मिळण्यासाठी हा निर्णय घेण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे असं प्रताप सरनाईक यांनी या प्रकल्पामागील धोरण स्पष्ट करताना सांगितले. आणि लवकरच त्या बाबतीत घोषणा होईल अशी ही माहिती त्यांनी दिली आहे. कारण मुख्यमंत्र्यांचा जो शंभर दिवसांचा कार्यक्रम आहे, त्यामध्ये बाईक टॅक्सीला निर्णय देण्याचाही समावेश आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले.
या बाईक टॅक्सीच्या भाड्याविषयी माहिती देताना ते म्हणाले, बाईक टॅक्सीसाठी प्रति किलोमीटरसाठी ३ रुपये भाडे आकारले जाणार आहे. बाईक टॅक्सीला जीपीएस यंत्रणा आवश्यक आहे. त्याचबरोबर बाईक चालकाच्या पाठीमागे बसणाऱ्याला हेल्मेट घालणे सक्तीचे असणार आहे. जी कंपनी बाईक टॅक्सी सेवा देईल, तिच्या कमीत कमी ५० बाईक असणे आवश्यक आहे असे या प्रकल्पांच्या नियमांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
बाईक टॅक्सी प्रकल्प पुन्हा सुरु होणार का?
मुंबईकरांसाठी आनंदाची आणि दिलासा दायक बातमी समोर आली आहे. मुंबईत निर्माण होणारी रोजची समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. ही समस्या अति वाहनांचा वापर केल्याने होत असते. या वाहतूक कोंडीपासून काही प्रमाणात सुटका मिळवण्यासाठी परिवहन खात्याकडून एक मार्ग काढण्यात आला आहे. राज्याच्या परिवहन खात्याकडून मुंबईत बाईक टॅक्सी सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येत आहेत. पुढील काही दिवसात या निर्णयाला मंजुरी देण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
या बाईक टॅक्सीचे भाडे किती असणार आहे?