Home लेटेस्ट न्यूज कडेठाण खूनप्रकरण: बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव फसला, दोन आरोपी पोलिस कोठडीत

कडेठाण खूनप्रकरण: बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव फसला, दोन आरोपी पोलिस कोठडीत

by Arjun Mandwale
0 comments

दौंड कडेठाण _येथील खूनप्रकरणातील आरोपी अनिल धावडे व त्याचा साथीदार सतीलाल मोरे यांना दौंड न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे अशी माहिती दौंड पोलिस उपअधीक्षक बापूराव दडस यांनी दिली आहे.

कडेठाण येथील लता धावडे या महिलेचा दिनांक ७ डिसेंबर २०२४ रोजी उसाच्या शेतात मृतदेह सापडला होता. त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात लता धावडे यांचा मृत्यू झाल्याचा भास निर्माण केला गेला होता. पोलिस आणि वनविभागाने केलेल्या कसून चौकशीत अनेक गोष्टी समोर आले आहेत.
नागपूर मधील प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेतून मिळालेल्या वैद्यकीय अहवालात लता धावडे वर बिबट्याचा हल्ला झालाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक नारायण देशमुख व पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खोल तपास केला असता त्यांनतर संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

अनिल धावडे व सतिलाल मोरे यांनी लता धावडे यांचा खून केल्याचे स्पष्ट झाले असता त्यांना पोलिसांनी दौंड न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडीत रवानगी केली.

You may also like

Leave a Comment

Search Here