Home लेटेस्ट न्यूज चड्डी बनियान वेषात यवत येथे घरात घुसून हल्ला!

चड्डी बनियान वेषात यवत येथे घरात घुसून हल्ला!

by sandy
0 comments

यवत स्टेशन रोड परिसरात राहत असलेल्या शशिकांत चव्हाण यांच्या घरात बुधवार, दि. ५ मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हल्ला करण्यात आला असल्याची बातमी उघडकीस आली आहे. यावेळी या परिसरात अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्री तीन चड्डी-बनियान घातलेल्या इसमांनी शशिकांत चव्हाण यांच्या घरात घुसून बेदम मारहाण केली असल्याची माहिती मिळाली आहे. 

यवत येथे घडलेल्या भयंकर या हल्ल्यात अविनाश म्हणजेच विश्वजीत शशिकांत चव्हाण याचा मृत्यू झाला असल्याची बातमी मिळाली आहे. शशिकांत चव्हाण, प्राची यादव आणि उज्वला चव्हाण हे या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी घराबाहेर असलेल्या अविनाश चव्हाण याच्यावर आधी हल्ला केला. त्यानंतर हे हल्लेखोर घरात घुसले आणि घरात घुसून त्यांच्याद्वारे कुटुंबातील तिघांवर अमानुष मारहाण करण्यात आली. परंतु मृत पावलेला अविनाश याची पत्नी सारीका चव्हाण हिने आपल्या तीन वर्षांच्या मुलासह बाथरूममध्ये लपून आपला आणि आपल्या मुलांचा जीव अगदी धाडसाने वाचवला. तिने मदतीसाठी शेजाऱ्यांना हाक मारली. त्यांचे शेजारी अरुण मुळीक व संतोष मुळीक आवाज ऐकून तिथे उपस्थित झाले. ते येताच चड्डी बनियान परिधान केलेले हल्लेखोर त्यांच्या चाहुलीने पळून गेले. यानंतर दीपक मुळीक, लक्ष्मण मुळीक, प्रणव मुळीक आणि कुमार मुळीक यांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पळून जाण्यात यशस्वी ठरले आणि त्यांच्या तावडीत सापडले नाही.

या प्रकरणी पोलीस तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस आणि पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे श्वानपथक (डॉग स्क्वॉड) नेमण्यात आले. हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला की त्यामागे काही अन्य कटकारस्थान आहे, याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे यवत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील सर्वच नागरिक अत्यंत बिथरले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

यवत येथे कुणावर हल्ला करण्यात आला?

यवत स्टेशन रोड परिसरात राहत असलेल्या शशिकांत चव्हाण यांच्या घरात बुधवार, दि. ५ मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हल्ला करण्यात आला असल्याची बातमी उघडकीस आली आहे. यावेळी या परिसरात अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्री तीन चड्डी-बनियान घातलेल्या इसमांनी शशिकांत चव्हाण यांच्या घरात घुसून बेदम मारहाण केली असल्याची माहिती मिळाली आहे. 

यवत हल्ला प्रकरण कसे घडले?

यवत येथे घडलेल्या भयंकर या हल्ल्यात अविनाश म्हणजेच विश्वजीत शशिकांत चव्हाण याचा मृत्यू झाला असल्याची बातमी मिळाली आहे. शशिकांत चव्हाण, प्राची यादव आणि उज्वला चव्हाण हे या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी घराबाहेर असलेल्या अविनाश चव्हाण याच्यावर आधी हल्ला केला. त्यानंतर हे हल्लेखोर घरात घुसले आणि घरात घुसून त्यांच्याद्वारे कुटुंबातील तिघांवर अमानुष मारहाण करण्यात आली. परंतु मृत पावलेला अविनाश याची पत्नी सारीका चव्हाण हिने आपल्या तीन वर्षांच्या मुलासह बाथरूममध्ये लपून आपला आणि आपल्या मुलांचा जीव अगदी धाडसाने वाचवला. तिने मदतीसाठी शेजाऱ्यांना हाक मारली. त्यांचे शेजारी अरुण मुळीक व संतोष मुळीक आवाज ऐकून तिथे उपस्थित झाले. ते येताच चड्डी बनियान परिधान केलेले हल्लेखोर त्यांच्या चाहुलीने पळून गेले. यानंतर दीपक मुळीक, लक्ष्मण मुळीक, प्रणव मुळीक आणि कुमार मुळीक यांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पळून जाण्यात यशस्वी ठरले आणि त्यांच्या तावडीत सापडले नाही.

You may also like

Leave a Comment

Search Here