62
नाशिक मधील पिंपळगाव शहरातील एका बांबू गोडाऊनला अचानक मोठी भीषण आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. आगीने इतका विक्राळ रूप धारण केले की, आसपासची काही दुकाने ही आगीच्या लाटेत येऊन खाक झाली.
आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट माहीत झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची पुष्टी अजून पर्यंत झालेली नाही. अधिक तपास स्थानिक प्रशासन आणि पोलीस करत आहे.