67
पुण्याच्या हिंजवडी परिसरात नुसत्या घडलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर आगीच्या घटनेत धक्कादायक खुलासा समोर आल आहे. ही आग नैसर्गिक नसून, वाहनचालक जनार्दन हंबर्डीकर यांनीच ती हेतु पुरस्सर लावल्याचे उघड झाले आहे.
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, हंबर्डीकर यांचा काही कर्मचाऱ्याण सोबत वाद होता आणि दिवाळीच्या काळात त्यांचा पगार कापला गेला होता. या रागातून त्यांनी बसमध्ये केमिकल आणि ज्वलनशील वस्तू ठेवल्या आणि बसला आग लावली.
या आगीत चार कर्मचाऱ्यांचा आगीत दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर काही जखमी झाले आहेत. पोलीस तपास सुरू असून, आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे.
ही घटना नियोजनबद्ध असल्यामुळे पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
या घटनेने सर्वत्र खळबळ माजवली आहे आणि आय टी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.