वरणगाव, – दारूच्या नशेत पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना वरणगाव परीसरातील आसरा माता मंदीरा जवळ सुसरी वेल्हाळे मार्गादरम्यान शनिवार ( ता. २२ ) रात्री वेल्हाळे शिवारातील विटभट्टयांवर घडली. कौटुंबिक वादातून पती आणि पत्नी दोघांमध्ये भांडणं झाली होती.
रागाच्या भरात त्यानं पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याची फिर्याद अजहर नियाजोद्दीन शेख मयत महीलेच्या भावाने वरणगाव पोलिसात दिली असुन या संतापजनक घटनेमूळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे
दारूच्या वाईट सवयी मुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. वरणगाव आणि परिसरातील सुसरी वेल्हाळे मार्गा नजिक बीड, उस्मानाबाद, परभणी या जिल्हयातील विट व्यवसायीकांनी विटांचे भट्टे सुरू केले आहेत या भट्टयांवर परजिल्हयातीलच मजुर भट्टे मालकांनी आणले आहेत.
त्यातील नियाजोद्दीन मनसुर शेख यांच एक मजूर कुंटूब या ठीकाणी गेली दोन वर्षापासुन मजूरी करीत आहे. यांचे सोबत मुलगी सना अजीज शेख व जावाई अजीज शेख सुध्दा आहेत.
मात्र जावाई अजिजला दारूचे व्यसन असुन तो नेहमी दारू पिऊन मुलगी सना सोबत भांडण करतो याचप्रमाणे त्याने शनिवार ( ता. २२ ) रात्री दारू पिऊन आल्याने दोघा पती पत्नीमध्ये भांडण झाल्याने पती अजीज शेख याने पत्नी सना शेख हिचा गळा आवळून हत्त्या केल्याचे मयत सना शेखचा भाऊ अझर नियाजोद्दीन शेख याने फिर्यादीत म्हटले आहे दोघांचा संसार सुरू होता. पण नवऱ्याला दारूचं व्यसन होतं. दारूमुळे दोघांमध्ये वारंवार भांडणं होत.
एकदा कौटुंबिक वादातून दोघांमध्ये टोकाचं भांडण झालं. याच टोकाच्या भांडणामुळे नवऱ्यानं बायकोची हत्याच केली आरोपी पतीनं रागाच्या भरात पत्नीचा गळा जोरात आवळला.
यादरम्यान पत्नीचा श्वास कोंडला गेला. ज्यामुळे पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरणगाव पोलिस स्टेशनचे सपोनि जनार्दन खंडेराव यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. मयत सना शेखचा मृतदेह वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदना करीता रवाना केला आहे.मात्र आरोपी पती घटना स्थळावरून पसार झाला असुन पोलिस त्याचा शोध घेत आहे