68
राज्यातील शेतकरी यांचे कर्जे माफी आणि विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषणाला बसलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी तिसऱ्या दिवशी उपोषण मागे घेतले. सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.
बच्चू कडू यांनी सांगितले की, सरकारने त्यांची मागणी गांभीर्याने घेतली असून त्यावर लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्यांनी आपल्या समर्थकांचे आणि जनतेचे आभार मानत पुढील लढ्याचा निर्धार व्यक्त केला.