कुंभमेळा २०२७ नाशिक-नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा हा दर १२ वर्षांनी आयोजित होणारा एक महत्त्वपूर्ण धार्मिक उत्सव आहे. तरी पुढील सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साली होणार आहे. त्याच्या तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध पावले उचलली आहेत.
मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्राधिकरणाच्या माध्यमातून कुंभमेळ्याच्या आयोजन आणि अंमलबजावणीसाठी आवश्यक ते नियोजन केले जाईल.
तसेच, त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी ११०० ते १२०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्यात दर्शन व्यवस्था, पार्किंग, कोरिडॉर, शौचालये आणि कुंडांची स्वच्छता यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. हा विकास दोन टप्प्यांत होणार असून, पहिला टप्पा सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत आणि दुसरा त्यानंतर पूर्ण केला जाईल.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील रस्ते, घाट, आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठीही विशेष प्रयत्न केले जात आहेत. गर्दी व्यवस्थापन, वाहतूक सुधारणा, आणि सुरक्षा व्यवस्था यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. ज्यामध्ये पायाभूत सुविधा, सुरक्षा, आणि भाविकांच्या सोयीसुविधांचा समावेश आहे