Home लेटेस्ट न्यूज रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा मुख्यमंत्र्यांना पत्र

रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा मुख्यमंत्र्यांना पत्र

by krish
0 comments
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हट

रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या कथित समाधीबद्दल अलीकडे एक महत्त्वपूर्ण घटना घडली आहे. माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही समाधी हटवण्याची मागणी केली आहे.

संभाजीराजें छत्रपतीच्या मते, वाघ्या कुत्र्याचा शिवकालीन इतिहासात कोणताही उल्लेख नाही, आणि भारतीय पुरातत्व विभागाकडेही कोणतेही या समाधीचे ऐतिहासिक महत्त्व सिद्ध करणारे कोणतेही पुरावे उपलब्ध नाही आहेत.

संभाजीराजें छत्रपतींनी राज्य शासनाच्या धोरणानुसार ३१ मे २०२५ पर्यंत ही समाधी हटवण्याची विनंती केली आहे, कारण १०० वर्षांहून अधिक जुनी संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे, १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच ही संरचना हटवणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

या मागणीमुळे रायगडाव रील किल्ल्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकार या संदर्भात काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here