63
अहिल्यानगर येथील नुकत्याच झालेल्या भाजप आमदारांच्या सत्कार समारंभात आपल्या राजकीय पुनर्वसनाची मागणी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे. या कार्यक्रमात त्यांनी विनोदाच्या सुरात म्हटले की, “या मंचावर सर्वच ‘आजी’ आहेत, मी एकटाच ‘माजी’ आहे. माझंही पुनर्वसन करावं.आणि माझ्याकडेही सर्वांनी लक्ष द्यावं.
माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या निलेश लंके यांनी 29,317 मतांनी पराभव केला होता. भाजप आमदारांनीही सुजय विखे पाटील यांच्या पुनर्वसनाची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. आता पक्षश्रेष्ठी या मागणीवर काय निर्णय घेतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.