54
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची शिफारस महाराष्ट्र विधानसभेने आज एकमताने ठराव मंजूर केला आहे, त्याची शिफारीश केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांच्या शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन, हा ठराव लोकभावनेचा आदर करणारा आणि भारतरत्न पुरस्काराचा गौरव वाढवणारा ठरला आहे.
मंत्री जयकुमार रावल यांनी ठराव मांडला आणि विधानसभेतील सर्व पक्षांच्या सदस्यांनी या ठरावाचे समर्थन केले असून, त्याला सर्वानुमते मंजुरी मिळाली.
या निर्णयानंतर, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता मिळाल्यानंतर, हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल.